BMC Maharashtra Mayor News LIVE : मनसे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद…
BMC Mumbai Maharashtra Mayor Lottery Announcement News in Marathi : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज आरक्षण निघणार आहे. त्यामुळे महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल हे आज स्पष्ट होणार आहे. सगळ्यांच लक्ष या महापौरपदाच्या सोडतीकडे लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
शनिवारवाड्याबाहेर रांगोळी घालत दिल्ली दरवाजाला फुलाची सजावट
शनिवारवाड्याबाहेर रांगोळी घालत दिल्ली दरवाजाला फुलाची सजावट करण्यात आली आहे.थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्याचा वर्धापनदिन समारंभ आयोजित करण्यात आलाय. मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ पाहिलेल्या शनिवारवाड्याचा आज २९४ वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात येतोय.
-
दीपक कुलाळ याच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने हल्ला
पुण्यातील हडपसरमध्ये शिवसेना (शिंदे ) गटाच्या उपसंघटक दीपक कुलाळ याच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा आरोप… राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उल्हास तुपे यांनी दीपक कुल्लाळ यांच्यावर दगडाने हल्ला केल्याचा आरोप…दीपक कुलाळ यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांचं जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिलीय.
-
-
मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून राजकीय घडामोडींना वेग
मुंबई महापालिकेत सर्वाधिक ८९ जागा जिंकलेल्या भाजपाने महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे.मात्र २१ नगरसेवकांच्या जोरावर शिवसेना महापौर पदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे.
-
मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टॅंपो पटली झाल्यानं हायवेवर वाहनांच्या तीन किलोमीटर लांब रांगा
मुलूंडपासून कांजूरमार्ग या येणारी वाहतूक बाधीत. भल्या पहाटे अपघात झाल्याने वाहतूक कोंडींचा चाकरमान्यांना फटका. ट्रॅफिक विभागाकडून क्रेन मागवून टॅंपो हटवण्याचे काम सुरू
-
भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेचे 10 उमेदवार पडले, मोठा वादा
शिवसेनेने जागा वाटपात जास्त जागा घेतल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची. संख्या कमी झाली असली असा दावा भाजपच्या पदाधिकार्यांकडून केला जात असला तरी भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या 10 उमेदवारांच्या पदरी पराभव आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून हाती आली आहे.
-
-
मनसे नेते संदीप देशपांडे यांची 10 वाजता पत्रकार परिषद…
राज्यातील 29 महापालिकांच्या महापाैर पदाची आज सोडत असून आरक्षण जाहीर होईल. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग येत असून मनसे नेते संदीप देशपांडे यांची दहा वाजता पत्रकार परिषद आहे.
-
BJP Mayor : सुदैवाने भाजपच्या माजी महापौर भीषण अपघातातून बचावल्या
मालेगावजवळ जळगावातील भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन आणि नगरसेवक सुनील महाजन या दाम्पत्याच्या कारचा अपघात. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे महाजन दाम्पत्यासह कारमधील सर्वजण बालबाल बचावले. मात्र कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी महाजन यांची कार थेट समोरील वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला.
-
-
BMC Election 2026 : भाजपच्या बंडखोरांमुळे मुंबईत शिवसेनेचे 10 उमेदवार पडले
शिवसेनेने जागा वाटपात जास्त जागा घेतल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली असली असा दावा भाजपच्या पदाधिकार्यांकडून केला जात आहे. पण भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या 10 उमेदवारांच्या पदरी पराभव आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून हाती आली आहे.
-
BMC Maharashtra Mayor : मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून राजकीय घडामोडींना वेग
मुंबई महापालिकेत सर्वाधिक 89 जागा जिंकलेल्या भाजपने महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे. मात्र 29 नगरसेवकांच्या जोरावर शिवसेना महापौर पदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू आहे.
-
Maharashtra Nagpur Mayor : नागपुरात भाजपने किती जागा जिंकल्या?
नागपूर महानगरपालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवत 102 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे महापौर हा नागपुरात भाजपचाच होणार. मात्र तो कोण्या प्रवर्गातून होणार आणि त्यासाठी दावेदार कोण? याकडे आता संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे. महापौर पदाची सोडत कशी काढली जाते, त्यानुसार महापौर पदाचे आरक्षण निघणार आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून ते महापौर बिनविरोध होण्यास पुरेसे आहे. परंतु महापौर पदासाठी काँग्रेसकडून उमेदवार देण्याची शक्यता सुद्धा नाकरता येत नाहीय.
-
BMC Maharashtra Mayor : महापौरपदामध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण
महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू. आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार. 2011 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण निश्चित. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक महापालिकांचा समावेश. पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी महापालिकांसाठी आरक्षण जाहीर. सोडतीनंतर कोणती महापालिका आरक्षित आहे की खुली, हे स्पष्ट होणार.
-
BMC Maharashtra Mayor : सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळातील परिषद सभागृहात सोडत निघणार
राज्यातील महापालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर होणार. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत प्रक्रिया. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळातील परिषद सभागृहात सोडत निघणार. महापौर पदाच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षण निश्चित. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी प्रथम आरक्षण जाहीर होणार. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्ग (OBC) आरक्षणासाठी सोडत निघणार.
-
BMC Maharashtra Mayor : आज महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघणार
मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी मागच्या आठवड्यात निवडणुका झाल्या. निकालानंतर आज महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघणार आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या महापौरपदाच्या सोडतीकडे लागलं आहे.
मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी मागच्या आठवड्यात निवडणुका होऊन निकाल लागला. आज राज्यातील सर्व महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत निघणार आहे. आजच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. महापौर पदाचं आरक्षण कुठल्याही प्रवर्गासाठी जाहीर होऊ शकते. त्या प्रवर्गाचा निवडून आलेला नगरसेवक त्या पक्षाकडे असणं गरजेच आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवत 102 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे महापौर हा नागपुरात भाजपचाच होणार. मात्र तो कोणत्या प्रवर्गातून होणार आणि त्यासाठी दावेदार कोण याकडे आता संपूर्ण नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे. पुणे महापौर पदासाठी सुद्धा आज आरक्षण निघणार आहे. पुणे महापालिकेचे महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल हे आज स्पष्ट होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज 29 महापालिकांच्या महापौर पदाची सोडत निघणार आहे.
Published On - Jan 22,2026 8:17 AM
