या टॉप -5 यूपीआय अॅप्समधून करा पैसे ट्रान्सफर, देशात कुठेही पाठवू शकता पैसे

| Updated on: Feb 27, 2021 | 12:43 PM

या टॉप -5 यूपीआय अॅप्समधून करा पैसे ट्रान्सफर, आपण देशात कुठेही पैसे पाठवू शकता (now transfer money easily from these top-5 UPI apps to anywhere)

या टॉप -5 यूपीआय अॅप्समधून करा पैसे ट्रान्सफर, देशात कुठेही पाठवू शकता पैसे
पेटीएमने ग्राहकांना दिली मोठी सुविधा, आता तुम्ही डिजिटल वॉलेटमध्ये थेट परदेशातून मागवू शकाल पैसे
Follow us on

मुंबई : पैसे काढण्यासाठी एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगा लावाव्या लागतात. मात्र आजकाल बरीच मनी ट्रान्सफर अॅप्स आली आहेत, जी तुमचा वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत करतात. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ही डिजिटल पेमेंट अ‍ॅप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत. चला अशीच काही अॅप्लिकेशन्स पाहूया. (now transfer money easily from these top-5 UPI apps to anywhere)

गुगल पे

हे गुगलचे व्हेरीफाय अॅप आहे. या अ‍ॅपद्वारे आपण दुसर्‍या Google पे वापरकर्त्यास पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे पाठविण्याव्यतिरिक्त या अॅपच्या मदतीने तुम्ही मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज, फूडपांडा ऑर्डर, अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे बिल पेमेंट यासारख्या गोष्टी करू शकता. चांगली गोष्ट म्हणजे गुगल पे मध्ये वापरकर्त्यांनाही कॅश बॅक मिळते.

भीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अॅप लाँच करीत डिजिटल इंडियाची सुरूवात केली. याचा उपयोग करून भीम वापरकर्त्यांसाठीच नव्हे तर इतर बँक खात्यांनाही पैसे पाठविले जाऊ शकतात. तसेच अ‍ॅपमधून क्यूआर कोड स्कॅन करुन बिल पे करता येते.

पेटीएम

मनी ट्रान्सफरच्या बाबतीत पेटीएम हा सर्वात जास्त वापरला जाणारा अ‍ॅप आहे. पेटीएममुळे सर्व प्रकारचे बिल पेमेंट, रिचार्ज व शॉपिंग करता येते. कंपनीकडून वेळोवेळी कॅशबॅक ऑफरदेखील दिल्या जातात. तथापि, पेटीएमवर पैसे हस्तांतरित करण्यासाठी केवायसी अ‍ॅक्टिवेटर असणे आवश्यक आहे.

फोन पे

इतर अ‍ॅप्सप्रमाणेच फोन पे देखील ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदी, बिल पेमेंट आणि रिचार्जची सुविधा देते. अ‍ॅपद्वारे पैसे पाठविण्यासह, आपण बेनेफिशरीही जोडू शकता, जेणेकरुन आपण जलद व्यवहार करू शकता. अशा प्रकारच्या अ‍ॅप्सद्वारे आपण आपल्या खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता.

मोबिक्विक

पेटीएम प्रमाणेच मोबीक्विक एक डिजिटल वॉलेट आहे जे यूपीआयला सपोर्ट देते. अ‍ॅपमध्ये विशेष ऑफर, बिल पेमेंट, कॅशबॅक आणि बरेच काही समाविष्ट आहे. (now transfer money easily from these top-5 UPI apps to anywhere)

इतर बातम्या

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, जिच्यापुढे बाईची इज्जतच राहिली नाही : चित्रा वाघ