…नाहीतर चित्रा वाघ असं नाव सांगणार नाही, पतीवर गुन्हा दाखल होताच चित्रा वाघ कडाडल्या

पोलिसांनी व्हॉट्सअ‌ॅपवर नोटीस पाठवली. त्यांना एवढी घाई झाली का?, " असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. (chitra wagh mahavikas aghadi maharashtra kishor wagh)

...नाहीतर चित्रा वाघ असं नाव सांगणार नाही, पतीवर गुन्हा दाखल होताच चित्रा वाघ कडाडल्या
चित्रा वाघ
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 12:33 PM

मुंबई : “आज माझे फोटो मॉर्फ केले गेले. मला फोन येतायत. कापून टाकू, मरुन टाकू अशा धमक्या येत आहेत. आज तर माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला. माझे कुठेही कारखाने नाहीत.  या गुन्ह्याबद्दल कसलीही चिठ्ठी आली नाही. मला या गुन्ह्याबद्दल अजूनही माहीत नाही. माझ्या पतींना चित्रा वाघ यांचा पती असल्याची सजा मिळत आहे. पोलिसांनी व्हॉट्सअ‌ॅपवर नोटीस पाठवली. त्यांना एवढी घाई झाली का?, ” अशी घणाघाती टीका भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.

मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरलेलं आहे. त्यांनी वनमंत्री संजय राठोड ( Sanjay Rathore) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, आज त्यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. त्या नाशिकमध्ये पत्राकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.  (chitra wagh criticises mahavikas aghadi and maharashtra and police for registering complaint against her husband kishore wagh)

मारून टाकून कापून टाकू, धमक्या येत आहेत

“आज माझे फोटो मॉर्फ केले गेले. मला फोन येतायतं. कापून टाकून, मरुन अशा धमक्या येहीत नाही. आज तर माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला. माझे कुठेही कारखाने नाहीत.  या गुन्ह्याबद्दल कसलीही चिठ्ठी आली नाही. व्हॉट्सअ‌ॅपवर नोटीस पाठवण्यात आली. पोलिसांना एवढी घाई झाली का?, माझ्या नवऱ्याने एकही रुपया घेतला नाही. जनतेला हे समजायला पाहिजे,” असे चित्र वाघ म्हणाल्या. तसेच, या प्रकरणात ज्याने पैसै घेतले त्याची अजून चौकशीच सुरु आहे. मात्र, माझे पती म्हणजेच किशोर वाघ हे तिथे उपस्थितच नव्हते, त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला गेला. असा गंभीर आरोप त्यांनी केला.

माझ्या नवऱ्याला त्रास दिला जातोय, दबाव टाकला जातोय

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “माझ्या नवऱ्याला त्रास दिला जातोय. आम्ही आमच्या संपत्तीचा सगळा हिशोब दिला आहे. विरोधकांना मला गुंतवायचं आहे. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. मात्र, माझ्या नवऱ्याला मानसिक त्रास दिला जातोय. छळलं जातंय,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच  “त्यांनी गुन्हा दाखल केला तर काहीही फरक पडत नाही. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायव्यवस्था या सरकारसारखी मुर्दाड नाही,” अशी घणाघाती टीकाही वाघ यांनी केली.

तुम्हा सगळ्यांना मीच पुरून उरणार

यावेळी बोलताना पोलिसांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी डगमगणार नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. “राज्यात एका मुलीचा खून झाला. तिला मारून टाकण्यात आलं. मी याबद्दल बोलले म्हणून माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्हाला वाटलं मी शांत बसेल?, पण तुम्हा सर्वांना मीच पुरुन उरणार आहे आणि तसं झालं नाही तर चित्रा वाघ असं नाव सांगणार नाही, ” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

इतर बातम्या :

साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, जिच्यापुढे बाईची इज्जतच राहिली नाही : चित्रा वाघ

अरुण राठोडने कबुली जबाब दिलेला ‘तो’ नंबर कुणाचा?, चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप; चौकशीची मागणी

(chitra wagh criticises mahavikas aghadi and maharashtra and police for registering complaint against her husband kishore wagh)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.