मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी 'दादू'चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?
Raj Thackeray And uddhav thackeray

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. परंतु आजही ते मास्क न घालता कार्यक्रमाला आले. |Raj Thackeray Without Mask

Akshay Adhav

|

Feb 27, 2021 | 11:27 AM

मुंबईमराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. परंतु आजही ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले. ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी दादूचं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?, असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. (MNS Chief Raj Thackeray Without Mask In Shivaji park over marathi Bhasha Din Event)

शिवाजी पार्कात मनसेने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी राज ठाकरे यांनी सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. मात्र राज ठाकरे यांनी मास्क लावलेला नव्हता.

मी मास्क घालतच नाही…!

कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बहुतेकांनी मास्क लावलेला होता. परंतु राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. साहजिकच कॅमेरे राज ठाकरे यांच्यावर खिळले. पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला मास्क न लावता प्रवेश

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर 7 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चेहऱ्याला मास्क न लावता मंत्रालयात आले होते. सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला मास्क होता परंतु राज ठाकरे यांच्याच चेहऱ्यावर मास्क नव्हता. यावेळीही पत्रकारांनी राज यांना प्रश्न विचारला असता, ‘सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही’, असं मोघम उत्तर देत, राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.

कृष्णकुंजवरही मास्क न लावता लोकांना भेटतात

विविधप्रश्नी अनेक पक्षाचे, संघटनेचे लोक राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटत असतात. राज ठाकरे हे देखील त्यांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवारण करत असतात. परंतु राज ठाकरे तिथेही मास्क लावलेले दिसून येत नाहीत.

(MNS Chief Raj Thackeray Without Mask In Shivaji park over marathi Bhasha Din Event)

हे ही वाचा :

मराठी भाषा दिन : कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत ‘मराठी’साठी आयुष्य वेचणारा नव्वदीतला तरुण!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें