Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही पण करता का ही चूक, मग बँक खाते रिकामे झालेच म्हणून समजा

Juice Jacking Attack | या हायटेक युगात तंत्रज्ञानाचा जितका फायदा आहे ना, तितकेच धोके पण आहे. तुम्ही जर वेळीच हे धोके ओळखले नाहीत तर तुम्हाला फटका बसलाच म्हणून समजा. आता ज्यूस जॅकिंग हे नवीन तंत्र या सायबर गुन्हेगारांनी आत्मसात केले आहे. तुम्ही बाहेरगावी कुठे मोबाईल चार्जिंगला लावला तर बँकेतील पैसा संपलाच म्हणून समजा...

तुम्ही पण करता का ही चूक, मग बँक खाते रिकामे झालेच म्हणून समजा
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 2:12 PM

नवी दिल्ली | 15 नोव्हेंबर 2023 : सायबर गुन्हेगार तुम्हाला फसवण्यासाठी कोणते जाळे टाकतील काही सांगता येत नाही. आता फसवेगिरीसाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. स्कॅमर्स डोके लढवतात आणि अनेकांची शिकार करतात. त्यांचे बँक खाते साफ करतात. त्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या जातात. तुमच्या खात्यातील रक्कम केव्हा उडवली जाते हे कळत पण नाही. Juice Jacking हा प्रकार हल्ली खूप वाढला आहे. केवळ फोन चार्जिंगला लावल्यावर तुमच्या खात्यातील जमा रक्कम झटक्यात गायब होते, इतके हे प्रगत तंत्रज्ञान खतरनाक आहे. त्यासाठी ना मेल पाठवला जातो, ना एसएमएस. पण तुमचे बँक खाते खाली होते हे नक्की.

कसा होता याचा वापर

Juice Jacking या नवीन तंत्रज्ञानाचा गंडविण्यासाठी हँकर्स, स्कॅमर्स वापर करतात. त्यासाठी हे धोकेबाज नकली चार्जिंग स्टेशन सार्वजनिक वाहतूक ठिकाणी लावतात. सेवा भाव, मदतीसाठी हे चार्जिंग स्टेशन लावल्याची धुळफेक करण्यात येते. तुम्ही अशा ठिकाणी फोन चार्जिंगला लावला तर फोन चार्ज होतो. पण तिकडे तुमच्या मोबाईलमधील डाटा चोरण्यात येतो. त्याआधारे बँक खात्यातील रक्कम चोरण्यात येते.

हे सुद्धा वाचा

अशी होते रक्कमेची चोरी

सायबर गुन्हेगार या चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमधील बँकिंग एप्स आणि मॅसेजचा एक्सेस मिळवतात. त्यानंतर बँक खात्यात लॉगिन करण्यात येते. त्यातील रक्कम काही सेकंदात उडविण्यात येते. विशेष म्हणजे ओटीपी आणि इतर सर्व माहिती हँकर्सच्या ताब्यात गेल्याने तुम्हाला माहिती न होताच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होते.

कुठे घ्याल काळजी

सायबर गुन्हेगार हे नकली चार्जिंग स्टेशन सार्वजनिक ठिकाणी अधिक लावतात. वाहतूक स्थळी ही जास्त आढळून येतात. बस स्टँड, बस्ट स्टॉप, रेल्वे स्टेशन, विमानतळ, खासगी वाहनतळ या ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन असतात. मोठ्या बाजारपेठांमध्ये काही ठिकाणी फ्री वायफायची सुविधा देण्यात येते. अशा ठिकाणी पण असा धोका असू शकतो.

असा टाळा धोका

मोबाईलमधील बॅटरी संपत आली असताना सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगशिवाय पर्याय नसेल तेव्हा एक काळजी घेणे आवश्यक आहे. चार्जिंग पिन लावल्यानंतर मोबाईल त्वरीत तुम्हाला Share Data, Trust this Computer अथवा Charge Only असा पर्याय समोर येईल. अशावेळी चार्ज ओन्ली हा पर्याय निवडा.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.