OnePlusचा ‘हा’ पॉवरफुल फोन लाँच, Samsung-Appleची चिंता वाढली
ग्राहकांसाठी उत्तम फीचर्ससह OnePlusचा हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. जर तुम्हीही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, चला तर मग जाणुन घेऊयात हा नवीन स्मार्टफोन कोणत्या फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे आणि तुम्हाला हा फोन कोणत्या किमतीत खरेदी करता येईल...

भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी तसेच स्मार्टफोन प्रेमींसाठी नवीन फ्लॅगशिप फीचर्ससह OnePlus 13s लाँच करण्यात आला आहे. तर सर पॉवरफुल फोनच्या महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या नवीनतम स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसर, AI फीचर्स, दमदार बॅटरी आणि उत्तम डिस्प्ले सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
तर हा स्मार्टफोन 5.5जी सपोर्ट असलेल्या या फोनच्या बाजूला एक नवीन प्लस बटन देण्यात आलेला आहे, इतकेच नाही तर हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये स्वतंत्र वाय-फाय चिप देखील वापरली गेली आहे. या फोनची विक्री कोणत्या दिवसापासून सुरू होईल आणि या फोनसोबत कोणत्या लॉन्च ऑफर्स उपलब्ध असतील? चला जाणून घेऊया.
OnePlus 13s चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेल्या OnePlus 13S स्मार्टफोनमध्ये 6.32-इंचाचा डिस्प्ले आहे जो 1.5K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.
चिपसेट: गती आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट मोबाईल प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे.
बॅटरी क्षमता: तर या स्मार्टफोनला 6260mAh च्या दमदार बॅटरीसह लाँच केलेला हा फोन 80W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो.
कॅमेरा सेटअप: 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेऱ्यासह लाँच झालेल्या या नवीनतम फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.
OnePlus 13s ची भारतात किंमत
या फोनचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. त्यातील 12जीबी / 256जीबी व्हेरिएंट असलेल्या फोनची भारतात किंमत 54 हजार 999 रूपये इतकी आहे. तर 12 जीबी / 512 जीबी व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत 59 हजार 999 रूपये आहे.
तर हा हँडसेट ब्लॅक वेल्वेट, पिंक सॅटिन आणि ग्रीन सिल्क या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.
तर या फोनच्या लाँच ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5000 रुपयांची सूट मिळेल. या फोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे आणि हा फोन 12 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.
या स्मार्टफोनला देणार टक्कर
OnePlus चा हा नवीनतम स्मार्टफोन Samsung Galaxy S24 5G या स्मार्टफोनला टक्कर देणार असून अमेझॉनवर सॅमसंगच्या 8/256 GB व्हेरिएंटची किंमत 51,900 रुपये आहे आणि अमेझॉनवर Apple iPhone 16e च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 53,600 रुपये आहे. त्यामूळे भारतीय बाजारात सॅमसंग आणि ॲपलची चिंता वाढली आहे.
