AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दमदार प्रोसेसर, 64MP कॅमेरासह Oneplus Nord CE 5G बाजारात, उरले फक्त काही तास

Oneplus Nord CE 5G स्मार्टफोन आज (10 जून) संध्याकाळी 7 वाजता लाँच केला जाणार आहे. लाँचिंगआधीच हा फोन ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉनवर सूचीबद्ध करण्यात आला आहे.

दमदार प्रोसेसर, 64MP कॅमेरासह Oneplus Nord CE 5G बाजारात, उरले फक्त काही तास
OnePlus Nord
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 10, 2021 | 5:53 PM
Share

मुंबई : Oneplus Nord CE 5G स्मार्टफोन आज (10 जून) संध्याकाळी 7 वाजता लाँच केला जाणार आहे. लाँच होण्यापूर्वीच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. या फोनची लाँचिंग डेट आणि वेळ जाहीर करण्याबरोबरच अ‍ॅमेझॉनवर फोनचे फीचर्स सादर करण्यात आले आहेत. अमेझॉनवरील लिस्टिंग पेजवर Notify Me हे बटणदेखील देण्यात आलं आहे. त्यावर क्लिक करून आपण स्मार्टफोनच्या लाँचिंगबद्दल अधिक अपडेट्स मिळवू शकता. (OnePlus Nord CE 5G is Launching today in India; check features)

वनप्लस कंपनी या स्मार्टफोनबद्दल सातत्याने ट्विटरवर टीझ करत आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे आणि यामध्ये CE म्हणजेच कोर एडिशन आहे.‘Core. A Little more than you’d expect.’ या टॅगलाईनसह हा फोन लाँच केला जाईल. Android Central च्या अहवालानुसार हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी चिपसेटने पॉवर्ड असेल. वनप्लस नॉर्ड Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसरसह सुसज्ज असेल.

OnePlus Nord CE 5G चे संभाव्य फीचर्स

मिळालेल्या माहितीनुसार OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरासह येईल. यासोबत यात 6.43 इंचांचा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे आणि याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटला पंच-होल कॅमेरा असेल, ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

OnePlus TV U1S Smart TV लाँच होणार

OnePlus कंपनी Nord CE 5G सह एक नवीन टीव्हीदेखील लाँच करेल, जो U Series अंतर्गत सादर केला जाईल. या स्मार्ट टीव्हीचं नाव OnePlus TV U1S Smart TV असं असेल. हा टीव्ही 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचांच्या तीन स्क्रीन साईजमध्ये लाँच केला जाईल. यासह यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट मिळेल. या टीव्हीध्ये HDR10+, HLG आणि MEMC video फॉरमॅट सपोर्ट असेल. साउंड आऊटपुटसाठी यामध्ये 30W स्पीकर दिला जाईल जो डॉल्बी अॅट्मॉस साउंडसह येईल.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(OnePlus Nord CE 5G is Launching today in India; check features)

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...