AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ChatGPT : OpenAI सर्व्हिस झाली ठप्प, जगभरातले यूजर्स त्रस्त, नेमकं काय घडलं ?

गुरुवारी संध्याकाळी अनेक तास चॅटजीपीटी सर्व्हिस बंद पडली. OpenAI ने या आउटेजची चौकशी सुरू केली आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 च्या सुमारास ChatGPT ची सर्व्हिस डाऊन होती. या इश्यूनमुळे सोशल मीडियावर अनेक युजर्सच्या मेसेजेसचा पाऊस पडला होता.

ChatGPT : OpenAI सर्व्हिस झाली ठप्प, जगभरातले यूजर्स त्रस्त, नेमकं काय घडलं  ?
OpenAI सर्व्हिस ठप्प झाल्याने यूजर्स त्रस्त
| Updated on: Jan 24, 2025 | 7:25 AM
Share

आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात ChatGPT माहीत नाही किंव हे नाव ऐकलं नसेल असे लोक फार कमी असतील. सगळ्यांनीच याचा वापर कधी ना कधी करून पाहिलाच असेल. मात्र हेच ChatGPT गुरूवारी अनेक तासांसाठी ठप्प झाले, त्याच फटाक जगभरातील लाखो यूजर्सना बसला. OpenAI या आऊटेजची तपासणी सुरू केली. ही समस्या प्रामुख्याने OpenAIच्या वेबसाइटवर होती. पण मोबाईल ॲप मात्र बऱ्यापैकी काम करत होतं. गुरूवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास ChatGPT बंद पडलं, त्यानंतर सोशल मीड्यावर अनेकांनी याबद्दल रिपोर्ट केलं होतं.

तांत्रिक बिघाडामुळे या समस्येचा सामना करावा लागत असून ती सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे OpenAI ने स्टेटस पेजवर नमूद केलं . आम्हाला API मध्ये समस्या जाणवत होती, त्यावर सध्या काम सुरू आहे असं ओपनएआय कडून सांगण्यात आलं.

चॅटजीपीटी म्हणजे काय ?

चॅटजीपीटी AI-संचालित चॅटबॉक्स आहे, जो OpenAI ने बनवला आहे. मनुष्यासारखं बोलणं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण, फोटो आणि व्हिडीओ बनवण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलं. ChatGPT मोठ्या लँग्वेज मॉडेलवर (LLM) तयार केले आहे, ज्याला GPT (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) म्हणतात. ChatGPT चे फायदे जाणून घेऊया.

  1. ChatGTPT हे प्रामुख्याने टेक्स बेस्ड ( मजकूरावर आधारित) प्रश्नांची उत्तरं देतं. युजर्सच्या गरजेनुसार कोणत्याही विषयावर माहिती पुरवतं.हे काम डेटा आणि मशीन लर्निंगच्या मदतीने करते. 30 नोव्हेंबर 2022 रोजी ChatGTPT लाँच करण्यात आले. हे OpenAI ने तयार केले आहे.
  2. ChatGTPT चा वापर खूपच सोपा आहे. यूजर्स फक्त ChatGTPTच्या वेबसाईटवर जातात आणि त्यांना जो प्रश्न असेल त्याबद्दल ते टाईप करतात. एका क्षणाच्या आतच ChatGTPT कडून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. जर युजर्सना ते उत्तर समाधाकारक वाटलं नाही, पटलं नाही तर ते त्यांच्या प्रश्नात बदल करून पुन्हा विचारू शकतात.
  3. ChatGTPT चे अनेक फायदे आहेत. त्यामधून शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा इत्यादी विषयांची माहिती सहजपणे मिळते. यामुळे वेळेची बचत होते. युजर्नसा त्यांच्या प्रश्नांची जलद आणि अचूक उत्तरे मिळतात.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.