
ओप्पो कंपनीने त्यांचा भारतीय बाजार पेठेत Oppo Pad 5 लाँच केला आहे. या नवीन टॅबलेटच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 10,050 mAh ची पॉवरफूल बॅटरी आहे. तुम्हालाही नवीन टॅबलेट खरेदी करायचा असेल तर ओप्पोचा योग्य रेंजमध्ये असलेला हा ओप्पो पॅड 5 खरेदी करा. तर खरेदी करण्यापुर्वी या टॅबलेटवर तुम्हाला किती खर्च करावा लागेल आणि त्यात कोणते फीचर्स आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
ओप्पो पॅड 5 ची भारतातील किंमत
ओप्पो पॅड 5 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या ओप्पो टॅबलेटची किंमत वाय-फाय व्हेरिएंटसाठी 26 हजार 999 रूपये आहे. तर वाय-फाय आणि 5 जी व्हेरिएंटची किंमत 32 हजार 999 रूपये असेल. हा टॅबलेट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे.
हा टॅबलेट सध्या प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि त्याची विक्री पुढील आठवड्यात 13 जानेवारी रोजी सुरू होईल. हे डिव्हाइस कंपनीच्या वेबसाइट तसेच फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाले तर मोटोरोला पॅड 60 प्रो, शाओमी पॅड 7 आणि वनप्लस पॅड गो 2 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
ओप्पो पॅड 5 चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या टॅबलेटमध्ये 12.1-इंचाची 2.8K एलसीडी स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे, टच सॅम्पलिंग रेट 540Hz पर्यंत आहे आणि 900 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा हँडसेट मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे, तसेच ग्राफिक्ससाठी एआरएम माली-जी615 एमसी2 जीपीयू आहे.
कॅमेरा: या टॅबलेटमध्ये 77 अंश फील्ड ऑफ व्ह्यू आणि ऑटोफोकससह एकच 8-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा सेन्सर देखील उपलब्ध आहे. टॅबलेट 30 fps वर 1080p रिझोल्यूशनपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
बॅटरी: 33 वॅट सुपरव्हीओसी वायर्ड फास्ट चार्ज सपोर्टसह 10,050 एमएएचची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.
कनेक्टिव्हिटी: या डिव्हाइसमध्ये चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी ब्लूटूथ आवृत्ती 5.4, वाय-फाय 6 आणि टाइप-सी पोर्ट आहे.