Oppo Reno : भारतात लवकरच लाँच होणार ओप्पो रेनो 8 सिरीज, अल्ट्रा फास्ट प्रोसेसरसह दमदार कॅमेरा

ओप्पो रेनो 8 लवकरच लाँच केला जाणार असल्याची माहिती नुकतीच कंपनीकडून देण्यात आला आहे. अतिशय आकर्षक डिझाईनमध्ये उपलब्ध या स्मार्टफोनला दमदार कॅमेरा देण्यात आला आहे. यासह हा स्मार्टफोन streamlined unibody डिझाइनसह उपलब्ध होणार आहे.  

Oppo Reno : भारतात लवकरच लाँच होणार ओप्पो रेनो 8 सिरीज, अल्ट्रा फास्ट प्रोसेसरसह दमदार कॅमेरा
भारतात लवकरच लाँच होणार ओप्पो रेनो 8 सिरीजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 11:03 PM

चिनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) भारतात आपली नवीन सिरीज ओप्पो रेनो 8 (Oppo Reno 8) लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. हा अपकमिंग स्मार्टफोन 18 जुलै रोजी ओप्पो रेनो 8 सीरीजअंतर्गत लाँच होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro स्मार्टफोन असे अपकमिंग स्मार्टफोनचे नाव असणार आहे. दरम्यान, लाँच होण्याआधीच या अपकमिंग स्मार्टफोनबद्दलचे फीचर्स (Features) आणि लुक्सची माहिती लीक झाली आहे. हा स्मार्टफोन 7.67mm पातळ आणि मोठ्या कॅमेरा बंपसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये अजून कुठले फीचर्स देण्यात आले आहे, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

काय असणार किंमत?

ओप्पो रेनो 8 शिमर ब्लॅक आणि शिमर गोल्ड कलर पर्यायांसह लाँच केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या फोनची किंमत 30 हजार ते 35 हजारांच्या दरम्यान असणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून 18 जुलैपासून हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध राहणार आहे.

डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स

या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये streamlined unibody डिझाइन देण्यात आली आहे. मोठे कॅमेरा बंप आणि स्लिमनेसमुळे, ओप्पो रेनो 8 स्मार्टफोन अधिक प्रीमियम आणि स्टायलिश दिसतो. या फोनच्या पुढील बाजूस डाव्या कोपऱ्यात पंच होल कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये सोनीच्या ड्युअल फ्लॅगशिप इमेज सेंसरसह तीन रियर कॅमेरे मिळणार आहेत, त्याचा प्राथमिक सेंसर 50 मेगापिक्सेल आणि 2-2 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आणि मॅक्रो लेंस देण्यात आले आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल. चांगल्या व्हिडिओग्राफीच्या अनुभवासाठी या फोनमध्ये अल्ट्रा एचडीआर व्हिडिओ आणि अल्ट्रा नाईट व्हिडिओ फीचर देखील दिले जाईल.

4500mAh ची बॅटरी

ओप्पो रेनो 8 मध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आले आहे, तर Oppo Reno 8 Pro मध्ये MediaTek Dimensity 8100 MAX प्रोसेसर आहे. फोनला 4500mAh ची बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळेल. फोनमध्ये फाईव्ह लेयर चार्जिंग प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे, की हा फोन 11 मिनिटात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. फोनमधील कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ v5.3, GPS/A-GPS, NFC, USB टाइप-C पोर्ट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आदी फीचर्स देण्यात आली आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.