AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कामासाठी भारतीय युजर्स Youtube वापरतात, प्लॅटफॉर्मकडून धक्कादायक डेटा सादर

व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी यूट्यूबने आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे. भारतातील 20 मिलियनहून अधिक प्रेक्षकांनी त्यांच्या टीव्हीवर YouTube पाहिले आहे.

'या' कामासाठी भारतीय युजर्स Youtube वापरतात, प्लॅटफॉर्मकडून धक्कादायक डेटा सादर
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 7:03 PM
Share

मुंबई : व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी यूट्यूबने आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे. भारतातील 20 मिलियनहून अधिक प्रेक्षकांनी त्यांच्या टीव्हीवर YouTube पाहिले आहे. यूट्यूबने म्हटले आहे की, भारतात या वर्षी मे महिन्यात 20 मिलियनहून अधिक लोकांनी त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर यूट्यूब पाहिले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्के अधिक आहे. गुगलच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मने हे देखील उघड केले की यूट्यूब व्ह्युवर्सची वाढती संख्या हिंदी, तामिळ, तेलुगू आणि इतर भारतीय भाषांमधील कंटेट पाहण्यास प्राधान्य देते. ( Over 2 crores viewers watch YouTube on their Smart TVs in India, platform released data)

गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले, “आधीच 20 मिलियनहून अधिक ग्राहक कनेक्टेड टीव्हीवर कंटेंट पाहात आहेत. म्हणूनच, कंटेंटचा वापर, कंटेंटची विविधता, कंटेंट उत्पादकांची ही क्रांती केवळ मोबाईल फोनपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही एक परिघटना (phenomenon) आहे जी मोबाईल फोन आणि कनेक्टेड टीव्ही दोन्हीवर घडत आहे.”

गुप्ता म्हणाले की, “गुगल भारताला अग्रगण्य डिजिटल अर्थव्यवस्था बनण्यास मदत करण्यास वचनबद्ध आहे. तसेच यूट्यूबसह डिजिटल व्हिडीओ विकसित केले आहेत. ते या प्रवासाला आकार देण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतील.”

यूट्यूब पार्टनरशिपचे संचालक सत्य राघवन म्हणाले की, “मोठ्या प्रमाणात ग्राहक विश्वसनीय कंटेंट/ इन्फॉर्मेशनच्या सोर्सेससाठी नवीन स्किल शिकण्यासाठी व्हिडीओचा वापर करतात. राघवन म्हणाले की, भारतातील 85 टक्के व्हिडीओ व्ह्यूवर्सनी सांगितले की त्यांनी कोविड -19 पासून यूट्यूबचा वापर पूर्वीपेक्षा जास्त करु लागले आहेत.”

YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर?

सध्याचा जमाना डिजीटल मिडीयाचा आहे. सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (Social Media) अनेकजण ट्रेन्डिंग आणि माहितीवर विषयांचे व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतात. देशात असे अनेक युट्युबर्स (YouTubers) आहेत जे युट्युबवर व्हिडीओ कंटेंट तयार करून वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. जर तुम्हीही व्हिडीओ क्रिएटर (Video Creator) आहात आणि तुम्हालाही युटयुबच्या माध्यमातून पैसा कमवायचा असेल तर युट्युब तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलं आहे.

या महिन्यापासून युट्युबने काही निवडक देशांमध्ये 100 मिलीयन युट्युब शॉर्ट्स (YouTube Shorts Fund) फंड देण्याची घोषणा केली आहे. हा फंड युट्युबवर शॉर्ट्स व्हिडीओ बनवणाऱ्यांना दिला जाणार आहेत. पण यासाठीची अट म्हणजे तुमचा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झालेला असावा. दर महिन्यात काही युट्युब क्रिएटर्सची निवड केली जाणार आहे. ज्यांना युट्युबकडून व्हिडीओसाठी पैसे दिले जाणार आहेत. या माध्यमातून युट्युबला आपला छोट्या व्हिडीओचा प्लॅटफॉर्म युट्युब शॉर्ट्सला प्रमोट करायचं आहे. त्यासाठी क्रायटेरियामध्ये बसलेल्या क्रिएटर्सना युट्युब बक्कळ पैसे देणार आहे. तुमच्या व्हिडीओच्या व्ह्यूज आणि एंगेजमेंटवरून तुम्ही महिन्याला 100 डॉलर्सपासून ते 10 हजार डॉलर्सपर्यंत कमाई करू शकता.

काय आहे युट्युब शॉर्ट्स?

युट्युब शॉर्ट्स हा युट्युबवरच्या कमी कालावधीच्या व्हिडीओंचा फॉरमॅट आहे. यामध्ये जास्तीत जास्त 60 सेकंदांपर्यंत व्हिडीओ तयार करायचा असतो. भारतासह जगभरात टिकटॉक (TikTok) व्हिडीओची क्रेझ निर्माण झाली होती. पण टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर छोट्या व्हिडीओची बाजारपेठ काबीज करण्यासाठी युट्युबने युट्युब शॉर्ट्स हा फॉरमॅट लॉन्च केला होता. गुगलच्या (Google) दाव्यानुसार युट्यूब शॉर्ट्स अल्पावधितच जगभरात हिट झाला आहे. मार्च महिन्यात युट्युब शॉर्ट्स व्हिडीओची व्ह्युअरशिप दररोज 6.5 बिलियनच्या जवळपास होती. ती आता 15 बिलियनच्या पुढे गेली आहे. हा फॉरमॅट आणखी प्रमोट करण्यासाठी युट्युबकडून 2021 आणि 2022 या दोन वर्षांसाठी 100 मिलीयन युट्युब शॉर्ट्स फंड देण्यात आला आहे.

कसे मिळणार पैसे?

तुम्ही युट्युब क्रिएटर आहात तर तुम्हाला आपल्या युट्युब चॅनेलवर शॉर्ट्स व्हिडीओच्या फॉरमॅटमध्ये व्हिडीओ पोस्ट करायचे आहेत. युट्युबच्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या आणि सर्वाधिक व्ह्युज आणि एंगेजमेट असणाऱ्या व्हिडीओसाठी युट्युब पैसे मोजणार आहे. त्यासाठी तुम्हाला महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बोनस फंडसाठी क्वालिफाय करावं लागेल. त्यानंतर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत तुम्ही बोनस क्लेम करू शकता. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचा बोनस एक्सपायर होऊ शकतो.

इतर बातम्या

ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात

डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच

सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, ‘या’ प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही

( Over 2 crores viewers watch YouTube on their Smart TVs in India, platform released data)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.