ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात

नोकिया G10 भारतात HMD ग्लोबलचा नवीन स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. जुलैमध्ये नोकिया जी 20 स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर, हे डिव्हाइस नोकिया जी सीरीजचं लेटेस्ट एडिशन म्हणून येतं.

ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 6:50 PM

मुंबई : नोकिया G10 भारतात HMD ग्लोबलचा नवीन स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. जुलैमध्ये नोकिया जी 20 स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर, हे डिव्हाइस नोकिया जी सीरीजचं लेटेस्ट एडिशन म्हणून येतं. नोकिया जी 10 च्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये मोठी बॅटरी तसेच मागील बाजूस ट्रिपल-लेन्स कॅमेरा सेटअप समाविष्ट आहे. नोकिया जी 10 ला नोकिया ब्रँडिंगसह रियर आणि फ्रंटला दोन्ही बाजूंनी क्लासिक लुक मिळतो. कंपनीने ते मिड-सेगमेंटमध्ये सादर केले आहे. अधिकृत ऑनलाइन नोकिया स्टोअरवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी आधीच उपलब्ध आहे. ( Nokia G10 launched with triple camera, 5050mAh battery at 12149 rs price)

नोकिया G10 ची किंमत 12,149 रुपये ठेवण्यात आली आहे आणि हा फोन आधीच विक्रीसाठी तयार आहे. हा फोन नाइट आणि डस्क या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनसाठी फक्त एकच मेमरी प्रकार आहे जो 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह येतो.

खरेदीदारांना डिव्हाइसवर सवलत देण्यासाठी नोकिया मोबाईल्सने Jio सोबत भागीदारी केली आहे. डिस्काउंटमुळे स्मार्टफोनची मूळ किंमत 999 रुपयांनी कमी झाली आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत 11,150 रुपये झाली. तसेच 249 आणि त्याहून अधिकचे रिचार्ज मिळवणारे जिओचे ग्राहक Myntra, PharmEasy, Oyo आणि MakeMyTrip वर 4,000 रुपयांच्या फायद्यांसाठी पात्र असतील.

फीचर्स

Nokia G10 मध्ये 6.5-इंच HD + डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 20: 9 आस्पेक्ट रेश्यो आणि वाटरड्रॉप सेल्फी शूटरसह येतो. स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो G25 SoC पर काम करतो आणि Android 11 चालतो. HMD Global डिव्हाईसवर दोन वर्षांसाठी सॉफ्टवेयर अपग्रेड आणि तीन वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट देखील देईल.

नोकिया जी 10 च्या ऑप्टिक्समध्ये 13 मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्ससह मागील बाजूस ट्रिपल-लेन्स कॅमेरा सेटअप समाविष्ट आहे. कॅमेरावर 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स तसेच 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि फ्लॅश एलईडी देखील आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शूटर आहे.

डिव्हाइसवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.0, वायफाय 802.11, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे. नोकिया G10 ची मेमरी मायक्रोएसडी कार्डने 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. स्मार्टफोन 5050 mAh बॅटरी पॅक ऑफर करतो. या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. गुगल असिस्टंटसाठी एक डेडिकेटेड बटण देखील आहे. नोकिया जी 10 चे वजन 197 ग्रॅम इतके आहे.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

( Nokia G10 launched with triple camera, 5050mAh battery at 12149 rs price)

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.