AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगलसोबतच्या वादानंतर Paytmकडून स्वदेशी मिनी स्टोअर अॅप लाँच, युजर्सना मिळणार जबरदस्त फायदा

विशेष म्हणजे युजर्सला ही वेबसाइट डाऊनलोड न करताच ऍपसारखा अनुभव देते.

गुगलसोबतच्या वादानंतर Paytmकडून स्वदेशी मिनी स्टोअर अॅप लाँच, युजर्सना मिळणार जबरदस्त फायदा
| Updated on: Oct 05, 2020 | 3:15 PM
Share

मुंबईः भारतीय पेमेंट अॅप असलेल्या पेटीएमनं ई-कॉमर्स क्षेत्रात चांगलाच दबदबा निर्माण केलेला आहे. जास्तीत जास्त युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी पेटीएमनं आता स्वतःचं अँड्रॉइड मिनी स्टोअर(Paytm Mini App Store) अॅप लाँच केलं आहे. पेटीएम मिनी स्टोअर अॅप हे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलं असून, ती एक मोबाइल वेबसाइट आहे. विशेष म्हणजे युजर्सला ही वेबसाइट डाऊनलोड न करताच अॅपसारखा अनुभव देते. या प्लॅटफॉर्ममुळे फक्त डेव्हलपर्सलाच फायदा होणार नाही, तर स्मार्टफोन युजर्सचा डेटा वाचणार असून, मेमरी सेव्ह करण्यासही मदत मिळणार आहे. (paytm launched mini app store )

पेटीएम कोणत्याही शुल्काशिवाय मिनी अॅप लिस्टिंगची सेवा देत आहे. पेमेंटसाठी डेव्हलपर्स युजर्सला पेटीएम वॉलेट, पेटीएम पेमेंट्स बँक, यूपीआय, नेट बँकिंग आणि कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी पर्याय देण्यास सक्षम आहे. कंपनी शून्य शुल्कावर पेटीएम वॉलेट, पेटीएम पेमेंट्स बँक अकाऊंट आणि यूपीआय सेवा देत आहे. तर क्रेडिट कार्डसारख्या इतर माध्यमातून फक्त 2 टक्के शुल्क वसूल करते. या ऍपचा उद्देश भारतातल्या डिजिटल युजर्सला सक्षम पर्याय उपलब्ध करून देऊन आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देण्याचा आहे.

Decathlon, Ola, Park +, Rapido, Netmeds, 1MG, Domino’s Pizza, FreshMenu, NoBroker सारखे 300 हून अधिक ऍप अशी सेवा देत आहेत. आता यात पेटीएमचाही समावेश झाला आहे. सध्या ही अॅप वेबसाइट बिटावर सुरू असून, ठरावीक युजर्सला वापरता येत आहे. सप्टेंबरपर्यंत 12  मिलियनहून अधिक वेळा या ऍपला युजर्सनं भेट दिली आहे. पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनीसुद्धा पेटीएम मिनी स्टोअर अॅप लाँच केल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. विजय शेखर शर्मा म्हणतात, मला गर्व आहे की, आज आम्ही असं काही तरी लाँच करत आहोत, जे भारतीय अॅपडेव्हलपरसाठी एक नवीन संधी निर्माण करेल. पेटीएम मिनी स्टोअर ऍप आपल्याला तरुण भारतीय डेव्हलपर्सला नवनवीन मार्गे पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. पेटीएम युजर्ससाठी हा एक अद्वितीय अनुभव असेल, कारण हे ऍप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. तसेच युजर्सला पेमेंट अॅपमध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यात सक्षम बनवत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पेटीएमचे अ‍ॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले होते. त्यावेळी पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र पेटीएमशी संबंधित इतर पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर अद्याप कायम आहेत.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.