AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी, POCO चा नवा 5G फोन दिवाळीनंतर बाजारात

POCO M4 Pro 5G बद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. आता हा स्मार्टफोन दिवाळीत लॉन्च होईल. हा स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चं अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जो या वर्षी मे मध्ये लॉन्च झाला होता.

33W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी, POCO चा नवा 5G फोन दिवाळीनंतर बाजारात
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 6:40 PM
Share

मुंबई : POCO M4 Pro 5G बद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. आता हा स्मार्टफोन दिवाळीत लॉन्च होईल. हा स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चं अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जो या वर्षी मे मध्ये लॉन्च झाला होता. आता कंपनीने पुष्टी केली आहे की, ते आपल्या 5G सेगमेंटमध्ये आणखी एक स्मार्टफोन समाविष्ट करणार आहेत, ज्याचे नाव Poco M4 Pro 5G असेल. हा फोन 9 नोव्हेंबरला अधिकृतपणे लाँच होईल. (POCO M4 Pro 5G to launch in India after Diwali 2021)

या स्मार्टफोनचा टीझर रिलीज करताना कंपनीने Power Up Your Fan अशी टॅगलाईन दिली आहे. पण कंपनीने अजून कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. आतापर्यंत या फोनबाबत अनेक लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन अलीकडेच Geekbench वर लिस्ट केलेला दिसला, ज्याचा मॉडेल क्रमांक 21091116AC आहे आणि C चा अर्थ चायनिज व्हेरिएंट असा आहे. या लिस्ट वरून हे समोर आले आहे की या डिवाइसमध्ये MediaTek Dimension 810 chipset चा वापर केला जाऊ शकतो, तर काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, हा फोन MediaTek Dimension 700 प्रोसेसर सह लॉन्च केला जाईल.

पोकोच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम दिला जाऊ शकतो. याच्या सॉफ्टवेअर डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यासोबतच कंपनीचा कस्टम MIUI देखील यामध्ये उपलब्ध असेल. Poco चा हा फोन 5G NR कनेक्टिव्हिटीसह येईल. तसेच या फोनमध्ये NFC सपोर्ट, GNSS आणि FM रेडिओ सपोर्ट उपलब्ध असेल.

चार्जिंग क्षमता वाढवण्यासाठी कंपनी यामध्ये 33W फास्ट चार्जर देऊ शकते. तसेच हा फोन रेडमी ब्रँडच्या स्मार्टफोनची रीब्रँडेड आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा फोन Redmi Note 11 चं वेगळं व्हर्जन असेल.

जुन्या लीक्स रिपोर्टनुसार, हा फोन 5000mAh बॅटरीसह सादर होऊ शकतो, तसेच यात 8 GB पर्यंत रॅम आणि बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.

इतर बातम्या

लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ठरलं ! JioPhone Next ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार, जाणून घ्या संभाव्य किंमत, तपशील आणि वैशिष्ट्ये

6000mAh बॅटरीसह येतात ‘हे’ 4 फोन, ज्याची सुरवातीची किंमत आहे 7,299 रुपये

(POCO M4 Pro 5G to launch in India after Diwali 2021)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.