AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाँचिंगपूर्वी POCO M4 Pro 5G चे फीचर्स लीक, 9 नोव्हेंबरला बाजारात, जाणून घ्या सर्व अपडेट्स

POCO M4 Pro 5G या महिन्यात लॉन्च केला जाईल आणि त्यात अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. तसेच, हा फोन अनेक लेटेस्ट फीचर्ससह सादर केला जाईल.

लाँचिंगपूर्वी POCO M4 Pro 5G चे फीचर्स लीक, 9 नोव्हेंबरला बाजारात, जाणून घ्या सर्व अपडेट्स
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 02, 2021 | 4:49 PM
Share

मुंबई : POCO M4 Pro 5G या महिन्यात लॉन्च केला जाईल आणि त्यात अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. तसेच, हा फोन अनेक लेटेस्ट फीचर्ससह सादर केला जाईल. आतापर्यंत, कंपनीकडून या फोनच्या स्पेसिफिकेशनचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, परंतु नवीन ट्विटनुसार, या फोनमध्ये 6 एनएम चिपसेट आणि 33W फास्ट चार्जर मिळेल. हा स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला लॉन्च होईल. हा स्मार्टफोन POCO M3 Pro 5G चा अपग्रेड व्हेरिएंट असेल. (POCO M4 Pro 5G will come with 33W fast charger know all updates ahead of launch)

हा स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चं अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जो या वर्षी मे मध्ये लॉन्च झाला होता. या स्मार्टफोनचा टीझर रिलीज करताना कंपनीने Power Up Your Fan अशी टॅगलाईन दिली आहे. आतापर्यंत या फोनबाबत अनेक लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन अलीकडेच Geekbench वर लिस्ट केलेला दिसला, ज्याचा मॉडेल क्रमांक 21091116AC आहे आणि C चा अर्थ चायनिज व्हेरिएंट असा आहे. या लिस्ट वरून हे समोर आले आहे की या डिवाइसमध्ये MediaTek Dimension 810 chipset चा वापर केला जाऊ शकतो, तर काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, हा फोन MediaTek Dimension 700 प्रोसेसर सह लॉन्च केला जाईल.

पोकोच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम दिला जाऊ शकतो. याच्या सॉफ्टवेअर डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यासोबतच कंपनीचा कस्टम MIUI देखील यामध्ये उपलब्ध असेल. Poco चा हा फोन 5G NR कनेक्टिव्हिटीसह येईल. तसेच या फोनमध्ये NFC सपोर्ट, GNSS आणि FM रेडिओ सपोर्ट उपलब्ध असेल.

शानदार कॅमेरा

Poco M4 Pro 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त ठरेल. तसेच, बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.

पॉवरफुल बॅटरी

चार्जिंग क्षमता वाढवण्यासाठी कंपनी यामध्ये 33W फास्ट चार्जर देऊ शकते. जुन्या लीक्स रिपोर्टनुसार, हा फोन 5000mAh बॅटरीसह सादर होऊ शकतो, तसेच यात 8 GB पर्यंत रॅम आणि बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. हा फोन रेडमी ब्रँडच्या स्मार्टफोनची रीब्रँडेड आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा फोन Redmi Note 11 चं वेगळं व्हर्जन असेल.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(POCO M4 Pro 5G will come with 33W fast charger know all updates ahead of launch)

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?