व्हॉट्सअॅपच्या सुरक्षेला ‘डबल व्हेरिफिकेशन’चे कवच!, कसे काम करेल नवीन फीचर? जाणून घ्या…

व्हॉट्सअॅप अकाउंटसह वैयक्तिक डेटाचा गैरवापर टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपवर डबल व्हेरिफिकेशन कोडसह लॉगिन प्रक्रिया केली जाणार आहे. यातून युजर्सच्या व्हॉट्सअॅप खात्याला अजून मजबूत सुरक्षा कवच मिळणार आहे.

व्हॉट्सअॅपच्या सुरक्षेला ‘डबल व्हेरिफिकेशन’चे कवच!, कसे काम करेल नवीन फीचर? जाणून घ्या...
WhatsAppImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 6:52 PM

मुंबई : मॅसेजिंग सेवा अधिक बळकट व सहज सोपी व्हावी यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) सारख्या संदेशवहन ॲपची निर्मिती करण्यात आली. कालांतराने काळ बदलला तशा लोकांच्या गरजाही बदलत गेल्या. त्यामुळे व्हॉट्सअॅपमध्येही वेगवेगळी फीचर्स, तंत्रज्ञान (Technology) विकसित होत गेले. त्यात नवीन वैशिष्ट्यांचा समावेश होत गेला. त्याच्या मदतीने मॅसेजिंग व्यतिरिक्त फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, लोकेशन इत्यादींची देवाणघेवाण सुरु झाली. एवढेच नाही तर आता याद्वारे तुम्ही लोकांना पैसेही पाठवू शकता. या सर्वांचा विचार करता व्हॉट्सअॅप आता लॉगिन प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी काम करत आहे. एका रिपोर्ट्सनुसार, अकाउंट लॉगइन करताना व्हॉट्सअॅप सिक्युरिटीचा अतिरिक्त फीचर्स (Feature) जोडण्यात येणार आहे. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल. हे नवीन फीचर कसे काम करेल याची सविस्तर माहिती पाहू या…

व्हॉट्सअॅप ट्रॅकर WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे, की आता युजरला अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी डबल व्हेरिफिकेशन कोड मिळेल. व्हॉट्सअॅप आता युजर्सची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणखी एक फीचर विकसित करत आहे, जे डबल व्हेरिफिकेशन कोडवर काम करणार आहे. दुसऱ्या डिव्हाइसवरून WhatsApp खात्यात लॉग इन करण्याचा कोणताही प्रयत्न होइल, त्या वेळी लॉग इन करत असणाऱ्या व्यक्तीला व्हेरिफाय करण्यासाठी ॲडिशनल व्हेरिफिकेशन कोड आवश्यक देणे आवश्यक राहणार आहे.

ऑटोमॅटीक कोड पाठवला जाईल

व्हॉट्‌सॲप अकाउंट व वैयक्तिक तपशिलांचा गैरवापर टाळण्यासाठी व्हॉट्‌सॲप डबल व्हेरिफिकेशन कोडसह लॉगिन प्रक्रिया मजबूत करणार आहे. जेव्हाही तुम्ही नवीन फोनवरून व्हॉट्सअॅपवर लॉग इन कराल तेव्हा चॅट लोड करण्यासाठी आणि बॅकअप घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर सहा अंकी ऑटोमॅटिक कोड पाठवला जाईल.

युजर्सना मिळेल अलर्ट

रिपोर्टनुसार, ‘जेव्हा व्हॉट्सअॅप अकाउंटमध्ये लॉग इन करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी होतो, तेव्हा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी 6 अंकी कोड आवश्यक असेल. अशा परिस्थितीत, फोन नंबरच्या मालकाला त्यांच्या खात्यात लॉग इन करण्याच्या प्रयत्नाबद्दल अलर्ट करण्यासाठी दुसरा संदेश पाठविला जातो. या प्रकरणात युजर्सला व्हॉट्सअॅपवरून कळेल की कोणीतरी त्यांच्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते दुसरा व्हेरिफिकेशन कोड टाकणार नाही.

Undo चाही पर्याय असेल

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, याशिवाय व्हॉट्सअॅप युजर्ससाठी Undo चा पर्यायही मिळणार आहे. यामुळे यूजर्सना चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करण्याचा पर्याय मिळेल. लवकरच  व्हॉट्सअॅपवरील पूर्ववत बटण स्क्रीनच्या खालच्या बाजूला पॉप अप होईल. रिपोर्टनुसार, जेव्हा यूजर डिलीट फॉर मी ऑप्शनवर टॅप करेल, तेव्हा व्हॉट्सअॅपच्या तळाशी Undo ऑप्शन दिसेल. हे फीचर जीमेलवर काम करते त्याच पद्धतीने काम करणार आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.