
या रक्षाबंधनाला, टाटा मोटर्सने रक्षणाच्या या सणाला घरापुरतx मर्यादित न ठेवता, देशाच्या जीवनवाहिन्यांवर… महामार्गांवर नेलं. ‘रक्षेचं बंधन’ या विशेष उपक्रमाअंतर्गत, जमशेदपूर येथील टाटा मोटर्सच्या संपूर्ण महिलांच्या दुर्गा लाइन विभागातील महिलांनी प्रेमाने राख्या तयार केल्या आणि ट्रक चालकांसाठी वैयक्तिक संदेश लिहिले, त्या चालकांना त्या कदाचित कधीच भेटणार नाहीत, पण त्यांची काळजी त्या दररोज घेतात.
या महिलांचा सहभाग भारतातील सर्वात सुरक्षित ट्रक तयार करण्यात असतो. ते ट्रक अत्याधुनिक सक्रिय आणि निष्क्रिय सुरक्षा तंत्रज्ञानांनी सुसज्ज असतात, जे चालक आणि माल दोघांचं संरक्षण करतात. त्यांच्या दृष्टीने, प्रत्येक चालक म्हणजे कुटुंब, प्रत्येक प्रवास महत्त्वाचा, आणि प्रत्येक सुरक्षा नवकल्पना ही काळजीचीच एक अभिव्यक्ती आहे.
या राख्या शेकडो किलोमीटर प्रवास करत नवी मुंबईतील कळंबोळी ट्रान्सपोर्ट नगर येथे पोहोचल्या, जिथे त्या ट्रक चालकांच्या मनगटावर बांधण्यात आल्या, त्या भारताचे सारथी आहेत, जे थांबता काम करता देश पुढे नेतात. या चालकांसाठी, ही कृती केवळ प्रतीकात्मक नव्हती; ती एक आठवण होती की, त्यांच्या प्रत्येक प्रवासावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे.
क्रॅश-टेस्टेड कॅबिन्सपासून हिल स्टार्ट असिस्ट, इंजिन ब्रेक्स, तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि ADAS सारख्या प्रगत पर्यायी सुरक्षा वैशिष्ट्यांच्या वापरापर्यंत — टाटा मोटर्स भारतीय चालकांसाठी सर्वात सुरक्षित ट्रक बनवण्याच्या प्रवासावर सतत पुढे जात आहे. कारण जेव्हा नाती मनापासून जुळतात, तेव्हा सुरक्षा देखील हृदयातूनच येते.
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स – नेहमीच चांगले.