AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8GB/128GB, 108MP कॅमेरासह Realme दमदार स्मार्टफोन लाँच करणार

रियलमीने एक नवीन टीझर जारी केला आहे ज्यामध्ये कंपनीने 108 मेगापिक्सल कॅमेर्‍यासह नव्या स्मार्टफोनची झलक दाखवली आहे.

8GB/128GB, 108MP कॅमेरासह Realme दमदार स्मार्टफोन लाँच करणार
Realme 108mp
| Edited By: | Updated on: Mar 15, 2021 | 7:09 AM
Share

नवी दिल्ली : रियलमी (Realme) कंपनीने एक नवीन टीझर जारी केला आहे ज्यामध्ये कंपनीने 108 मेगापिक्सल कॅमेर्‍यासह नव्या स्मार्टफोनची झलक दाखवली आहे. हा फोन 24 मार्च रोजी मार्केटमध्ये डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे नेमक्या याच दिवशी वनप्लस 9 सिरीजदेखील लाँच होणार आहे. (Realme 108MP camera smartphone confirmed to launch on March 24)

टीझर व्हिडिओमध्ये ग्रेटर नोएडामधील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट दाखविण्यात आलं आहे. या टीझर व्हिडिओमध्ये रियलमीचे सीईओ माधव सेठ स्पोर्ट्स कार चालवताना दिसत आहेत. 3 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दोन स्पोर्ट्स कार्सची झलक दाखवण्यात आली आहे.

दोन्ही कार्सच्या मदतीने इन्फिनिटी डिझाइन दर्शवण्याचा प्रयत्त केला आहे, जिथे कंपनीने 24 मार्च रोजी 108 मेगापिक्सल कॅमेर्‍यासह फोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. टीझरमध्ये असे लिहिले आहे की आम्ही 24 मार्च रोजी लाईव्ह येणार आहोत, तोपर्यंत आमच्यासोबत रहा.

टीझर व्हिडिओमध्ये फोनविषयी फारशी माहिती देण्यात आलेली नाही. परंतु याबाबत काही रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 24 मार्च रोजी रियलमी 8 सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाण्याची शक्यता आहे. तसेच यामधील स्टँडर्ड मॉडेलमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे, तर याच्या प्रो मॉडेलमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

माधव सेठ यांनी काही दिवसांपूर्वी रियलमी 8 वर्जनच्या वॅनिला मॉडलबाबत पोस्ट केली होती. मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 6.4 इंचांचा एमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी 95 चिपसेट, 5000mAH क्षमतेची बॅटरी आणि 30W चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

कसा असेल रियलमी 8 प्रो?

रियलमी 8 प्रो दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, ज्यामध्ये 6 जीबी, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाऊ शकते. त्याच वेळी, यूआय 2.0 आधारित Android 11 सह फोनमध्ये 4500mAh बॅटरी आणि 65 वॅट्स चार्जिंगची सुविधा दिली जाऊ शकते. कॅमेराच्या बाबतीत, या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो सॅमसंग ISOCELL HM2 सेन्सरसह येईल.

इतर बातम्या

जगातला पहिला 18GB RAM वाला स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

OPPO चे दोन नवीन स्मार्टफोन F19 Pro+ 5G आणि F19 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Realme 108MP camera smartphone confirmed to launch on March 24)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.