
रियलमीने त्यांचा नवीन Realme 14 Pro Series ५जी मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. या सीरिजमध्ये Realme 14 Pro आणि Realme 14 Pro Plus यांना धमाकेदार फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, रियलमी 14 प्रो प्लस 5 जी हा जगातील पहिला फोन आहे जो कोल्ड सेन्सिटिव्ह कलर चेंजिंग डिझाइनसह लाँच करण्यात आला आहे, म्हणजेच तापमान 16 डिग्रीच्या खाली जाताच फोन रंग बदलतो.
एवढंच नाही तर प्रो प्लस व्हेरियंट हा जगातील पहिला फोन आहे ज्यात तुम्हाला एक-दोन नाही तर ट्रिपल फ्लॅश सिस्टिम मिळेल. चला तर मग आम्ही तुम्हाला दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि त्यांच्या किंमतींची माहिती सांगत आहोत ते जाणून घेऊयात.
डिस्प्ले : रियलमी 14 प्रो 5जी या फोनमध्ये ६.७७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. हा फोन क्वाड कर्व्ह डिस्प्ले आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेससह लाँच करण्यात आला आहे.
प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी रियलमी 14 प्रोमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7300 एनर्जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
बॅटरी क्षमता : या फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
कॅमेरा सेटअप : फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, तर फोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा-क्लिअर सेल्फी कॅमेरा आहे.
डिस्प्ले : क्वाड कर्व्ड डिस्प्लेसह येणाऱ्या या फोनमध्ये ६.८३ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे जो १.५ के रिझोल्यूशन देतो.
प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जनरेशन 3 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप : फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स८९६ कॅमेरा सेन्सर, ५० मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. फोनच्या फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा अल्ट्रा क्लिअर सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी क्षमता : 6000 एमएएचच्या दमदार बॅटरीसह येणाऱ्या या फोनमध्ये 80 वॉट सुपरव्हीओसी चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.
रियलमी 14 प्रो प्लस 5जी या फोनचे ८ जीबी/१२८ जीबी असलेल्या व्हेरियंटची किंमत २९,९९९ रुपये इतकी आहे तसेच ८ जीबी/२५६ जीबी व्हेरियंट असलेला फोनची किंमत ३१,९९९ रुपये इतकी आहे. तर १२ जीबी/२५६ जीबी असलेल्या फोनची किंमत ३४,९९९ रुपये इतकी आहे. तर कंपनीने असे तीन व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. तसेच बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. सेलबद्दल बोलायचे झाले तर या फोनची विक्री २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता Realme.com वर आणि फ्लिपकार्टवर सुरू होईल.
या रियलमी 14 प्रो 5जीया फोनचे कंपनीने 8 जीबी/128 जीबी आणि 8 जीबी/256 जीबी असे दोन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. तर यातील 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास २ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. या फोनची विक्रीही २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.