50MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, अवघ्या 10999 रुपये किंमतीत Realme C25Y स्मार्टफोन लाँच

आपल्या एंट्री-लेव्हल सी-सीरीजचा विस्तार करत, स्मार्टफोन ब्रँड Realme ने गुरुवारी एक नवीन फोन-Realme C25Y लॉन्च केला, जो 50 मेगापिक्सेल AI- बेस्ड ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो.

50MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, अवघ्या 10999 रुपये किंमतीत Realme C25Y स्मार्टफोन लाँच
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 8:05 PM

मुंबई : आपल्या एंट्री-लेव्हल सी-सीरीजचा विस्तार करत, स्मार्टफोन ब्रँड Realme ने गुरुवारी एक नवीन फोन-Realme C25Y लॉन्च केला, जो 50 मेगापिक्सेल AI- बेस्ड ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. Realme C25Y दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. (Realme C25Y Launched in India With 50-Megapixel Primary Camera, check Price, Specifications)

Realme C25Y च्या 4 GB रॅम + 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 4 GB रॅम + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. हा फोन ग्लेशियर ब्लू आणि मेटल ग्रे या दोन रंगांमध्ये येतो. स्मार्टफोनची पहिली विक्री 27 सप्टेंबरपासून realme.com, फ्लिपकार्ट आणि मेनलाइन चॅनेलवर सुरू होईल.

50 मेगापिक्सेल मोड देणारा Realme C सिरीजमधील पहिला फोन आहे. Realme C25Y क्लियर फोटो शूटिंग ऑफर करतो. ज्यामुळे युजर्सना 8160 x 6144 पर्यंत मोठ्या पिक्सेल इमेज कॅप्चर करता येतात, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

एआय ब्यूटी फंक्शनसह स्मार्टफोन 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पॅक ऑफर करतो, ज्यामुळे उत्कृष्ट आणि परफेक्ट सेल्फी फोटो शूट करणे सोपे होते. हा स्मार्टफोन 6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 88.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्योसह युनिसॉक टी 610 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. ग्राफिक्स ARM माली G52 GPU द्वारे हाताळले जातात, ज्याचं क्लॉक स्पीड 614.4 MHz आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh रेटेड बॅटरी आहे, जी स्टँडबाय मोडमध्ये 48 दिवस टिकू शकते. तसेच 18W क्विक चार्जला सपोर्ट करते. हा फोन फिंगरप्रिंट अनलॉकिंग आणि फेशियल रिकग्निशनसह येतो, जो युजर्सची प्रायव्हसी कायम ठेवतो.

8000 रुपयांच्या रेंजमध्ये Realme चा ढासू स्मार्टफोन बाजारात

Realme ने गेल्या आठवड्यात भारतात C21Y स्मार्टफोन लाँच केला. रियलमी C21Y हा लेटेस्ट एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोठी बॅटरी आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन सी सीरीजच्या फोनसारखाच आहे. C21Y लाइट वापरकर्त्यांसाठी एक उत्तम फोन आहे. त्याच वेळी, जे लोक फीचर फोनवरून स्मार्टफोनवर स्विच करत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा हा फोन एक उत्तम पर्याय आहे.

गेल्या महिन्यात व्हिएतनाममध्ये Realme C21Y लाँच करण्यात आला होता. एंट्री लेव्हल स्मार्टफोन असूनही, यात अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, यात आय प्रोटेक्शन फीचरचाही समावेश आहे. Realme C21Y TUV Rheinland प्रमाणित डिस्प्ले वापरते, जो हाय ब्राईटनेस, व्हाइट लाइट आणि आय प्रोटेक्शन फीचरसह येतो.

रियलमी C21Y ची किंमत 8,999 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. त्याचबरोबर 9,999 रुपयांमध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळते. हा फोन क्रॉस ब्लू आणि क्रॉल ब्लॅक रंगात येतो. हा फोन विक्रीसाठी सोमवारपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे.

इतर बातम्या

ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात

डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच

सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, ‘या’ प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही

(Realme C25Y Launched in India With 50-Megapixel Primary Camera, check Price, Specifications)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.