Realme Watch 3 Sale सुरू, ‘इतक्या’ कमी किमतीत मिळणार ब्ल्यू टूथ कॉलिंगची मजा !

जर तुम्हाला एखादे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. रिअलमी कंपनीच्या नव्या स्मार्टवॉचवर आज मोठी सूट मिळत असून त्यामध्ये ब्ल्यू-टूथ कॉलिंगचा पर्यायही समाविष्ट आहे. 3 हजारांपेक्षा कमीी किमतीत हे स्मार्टवॉच विकत घेता येणार आहे. जाणून घ्या काय आहेत या स्मार्टवॉचची वैशिष्ट्ये..

Realme Watch 3 Sale सुरू,  'इतक्या' कमी किमतीत मिळणार ब्ल्यू टूथ कॉलिंगची मजा !
'इतक्या' कमी किमतीत मिळणार ब्ल्यू टूथ कॉलिंगची मजा !
Image Credit source: twitter
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 02, 2022 | 1:39 PM

रिअलमी कंपनीच्या ‘रिअलमी वॉच 3’ या स्मार्टवॉचची (Realme Watch 3 Smartwatch) विक्री आजपासून ग्राहकांसाठी सुरू झाली आहे. या नव्या स्मार्टवॉचचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये 1.8 इंचाचा टच डिस्प्ले (Touch Display) देण्यात आला आहे. त्याशिवाय या वॉचमध्ये 110 स्पोर्ट्स मोड्स (110 sports mode)देण्यात आले आहेत. तसेच ब्ल्यू-टूथ कॉलिंगची (Bluetooth calling) सुविधाही आहे. धूळ आणि पाणी प्रतिरोधक (Dust and Water Resistant) असणाऱ्या या स्मार्टवॉचला आयपी68 (IP68) रेटिंग मिळाले आहे. जर तुम्हीही एक नवे स्मार्टवॉच घेण्याच्या विचारात असाल तर ही एक उत्तम संधी आहे. भारतातील या स्मार्टवॉचची किंमत ( smartwatch price in India)आणि त्याची इतर वैशिष्ट्यांची विस्ताराने माहिती जाणून घेऊया.

काय आहेत Realme Watch 3 चे स्पेसिफिकेशन्स ?

रिअलमी वॉच 3 मध्ये 240×286 पिक्सेल सह 1.8 इंचांचा टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये ग्राहकांसाठी ब्ल्यू-टूथ कॉलिंग सपोर्ट देण्यात आला असून इन-बिल्ट मायक्रोफोन आणि स्पीकर सिस्टीमही अनुभवायला मिळेल. कम्पॅटिबल ॲपद्वारे तुम्ही वॉच फेस, सहजरित्या कस्टमाइज करू शकाल. हे नवे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरू शकतो, असा दावा या वॉचच्या बॅटरीबाबत कंपनीकडून करण्यात आला आहे. या वॉचमध्ये ग्राहकांना 100 पेक्षा जास्त वॉच फेसचा पर्याय मिळेल.

त्याशिवाय रिअलमी वॉच 3 या स्मार्टवॉचमध्ये ग्राहकांसाठी वर्कआऊट ट्रॅकिंगसाठी 110 पेक्षा अधिक फिटनेस मोड्सचा ऑप्शन असेल. हेल्थ फीचर्सबाबतीत सांगायचे झाले तर, या स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सीजन, हार्ट-रेट याशिवाय स्टेप ट्रॅकिंग आणि स्लीप (किती तास झोपलो) हे ट्रॅक करणे यासह अनेक सुविधा मिळतील.

हे सुद्धा वाचा

Realme Watch 3 ची भारतातील किंमत

रिअलमीच्या या स्मार्टवॉचची (Realme Watch 3) किंमत 3499 रुपये इतकी आहे. मात्र सध्या सेल सुरू असल्याने या वॉचच्या किंमतीवर मोठी डिस्काऊंट मिळत आहे. सध्या हे स्मार्टवॉच तुम्ही 2999 रुपये या इंट्रोडक्टरी किमतीली खरेदी करता येणार आहे. रिअलमीचे हे स्मार्टवॉच ‘ग्रे’ आणि ‘ब्लॅक’ या दोन रंगात उपलब्ध आहे. रिअलमी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवरही हे स स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हे स्मार्टवॉच खरेदी करत असाल तर ॲक्सिस बँकेच्या कार्डावर 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें