
शाओमी कंपनीचा नवीन स्मार्टफोन Redmi Note 15 SE 5G च्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. हा फोन भारतात 2 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. लाँच होताच हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने या फोनचे डिझाइन आणि रंगांचे पर्याय आधीच दाखवले आहेत. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Redmi Note 14 SE पेक्षा एक अपग्रेड आहे. रेडमी नोट सिरीज नेहमीच कमी किमतीत चांगली फिचर्स देण्यासाठी ओळखली जाते. चला तर मग लवकरच लॉंच होणारा नोट 15 एसई ची किंमत आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.
Redmi Note 15 SE चे डिझाइन खूपच प्रीमियम दिसते. या फोनला चेरी रेड रंग आणि गोल्डन मेटल फ्रेम देण्यात आली ज्यामुळे हा फोन एक आकर्षक लुक देतो. तसेच या फोनचा मागील पॅनल खूपच स्टायलिश आहे, मात्र कॅमेऱ्याचे डिझाइन अद्याप पूर्णपणे समोर आलेले नाही. तरीही, विशेषतः या किंमतीच्या रेंजमध्ये हा फोन खूपच प्रीमियम दिसतो.
रेडमी नोट 15 SE मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. त्याची ब्राइटनेस 3200 nits पर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्टपणे दिसेल.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 3 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, जो वेगवान आणि सुरळीत कामगिरी देईल. हा प्रोसेसर दैनंदिन कामे, मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी चांगला मानला जातो.
कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेडमी नोट 15 SE मध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा असण्याची शक्यता आहे, जो उत्कृष्ट फोटो क्वालिटी देईल. यामध्ये 8MP चा सेकंडरी कॅमेरा देखील असू शकतो. सेल्फीसाठी यामध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
बॅटरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5,520mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ तुमचा फोन लवकर चार्ज होईल आणि जास्त वेळ टिकेल.
रेडमी नोट 14 SE हा फोन लाँचच्या वेळी 15,000 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध होता, पण आता या फोनची किंमत 19,999 झाली आहे. यामागे मेमरीचा वाढता खर्च हे कारण आहे. परिणामी रेडमी नोट 15 SE ची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. तथापि कंपनीने अद्याप त्याची किंमत जाहीर केलेली नाही.