फीचर्स नवे, किंमत तेवढीच, ‘रॉयल एनफिल्ड बुलेट 500’ नव्याने लॉन्च

फीचर्स नवे, किंमत तेवढीच, 'रॉयल एनफिल्ड बुलेट 500' नव्याने लॉन्च
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350(Classic 350)च्या किंमतीत वाढ

मुंबई : रॉयल एनफिल्ड बुलेट 500 (Royal Enfield Bullet 500) ही बाईक नव्या फीचर्ससह पुन्हा लॉन्च करण्यात आलीय. अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच एबीएससह नव्याने रॉयल एनफिल्डची ही बाईक लॉन्च केली गेलीय. 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेली रॉयल एनफिल्डची ही पहिली बाईक आहे, जिच्यामध्ये एबीएस सुविधा देण्यात आलीय. इतर काही वृत्तांनुसार, बुलेट 350 मध्येही एबीसी सुविधा दिली जाईल. दरम्यान, रॉयल एनफिल्डची किंमत मात्र तेवढीच ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, 1 लाख 86 हजार रुपये (एक्स शोरुम – दिल्ली) एवढीच किंमत रॉयल एनफिल्ड बुलेट 500 बाईकची असेल.

गेल्याच महिन्यात रॉयल एनफिल्डने बुलेटच्या 350 सीसी आणि 500 सीसी अशा दोन मॉडेलमध्ये रिअर डिस्क ब्रेक्स समाविष्ट केले होते. 350 सीसी मॉडेलमध्येही दोन महिन्यांनी म्हणजे मार्चमध्ये एबीएस सुविधा दिली जाऊ शकते. डिसेंबर 2018 मध्ये कंपनीने रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 रेडिच एडिशनचं एबीएस व्हर्जन लॉन्च केलं होतं.

सरकारच्या नियमांनुसार, 1 एप्रिल 2019 च्या आधी 125 सीसीहून अधिक क्षमतेच्या बाईक्समध्ये एबीएस सुविधा अनिवार्य आहे. बुलेट 500 मध्ये एबीएस वगळता इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे ही बाईक आधीप्रमाणेच स्टँडर्ड फीचर्ससारख्या टायगर-आय लॅम्प्स, क्लासिक राऊंड हेडलॅम्प्स आणि सिंगल-पीस सीटसह उपलब्ध असेल. शिवाय, व्हील्स डिस्क ब्रेक्स आणि ड्युअल चॅनल एबीएस यांचा नव्याने समावेशही असेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI