
बॉलिवूडमधील छोटा नवाब, सैफ अली खान याच्यावर घरात शिरलेल्या हल्लेखोराने 6 वार केले. त्यातील दोन वार जबरी होते. सैफ सध्या सेफ आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हल्ला झाल्यानंतर चोरटा इमारतीमधील पायऱ्यांवरून पळाला. 6 व्या मजल्यावरील कॅमेऱ्यात तो कैद झाला. याप्रकरणात एक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्लेखोर हुडकण्यात पोलिसांना या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा झाला. कोणते आहे हे तंत्रज्ञान?
Data Dump तंत्रज्ञानाचा फायदा
पोलिसांनी सैफ अली खान याच्यावरील हल्लेखोराला ओळखण्यासाठी Data Dump तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे त्याच्या मोबाईलचे लोकेशन समोर आले. त्यानंतर हल्लेखोराची ओळख पटली. तर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना त्याची ओळख पक्की झाली.
काय आहे Data Dump तंत्रज्ञान?
सैफ अली खानवर हल्ला करून चोरटा पायऱ्यावरून पसार झाला. पोलिसांनी या परिसरातील डेटा ड्रम्प एकत्र केले. डेटा डंम याच्या मदतीने त्या परिसरातील मोबाईल टॉवरचा डेटा एकत्रित मिळतो. पोलिसांनी हल्ल्यावेळचा सर्व मोबाईल टॉवरवरील डेटा डंप घेतला. त्याआधारे पोलीस हल्लेखोरापर्यंत पोहचली.
कोणत्या पण परिसरात एका मर्यादित स्वरुपात मोबाईल फोन टॉवर लागलेले असतात. या टॉवरच्या मदतीने त्या परिसरातील सर्व सक्रिय, ॲक्टिव असणाऱ्या मोबाईल फोन नेटवर्कची माहिती मिळते. डेटा डंप तंत्रज्ञानाआधारे त्या टॉवरवर किती मोबाईल क्रमांक जोडले त्याची माहिती मिळते. तर मोबाईल किती वेळ ॲक्टिव होता, तो कधी बंद झाला, याची माहिती मिळते. अर्थात हे तंत्रज्ञान केवळ फोन लोकेशन ट्रेस करण्यासाठी उपयोगी पडते.
प्रत्येक मोबाईल टॉवर हा फोन कनेक्ट झाला की त्याचा डेटा स्टोअर करतात. जेव्हा कोणताही मोबाईल एखादा टॉवरशी कनेक्ट होतो. तेव्हा या टॉवरवर त्याचे एक खाते तयार होते. जेव्हा मोबाईल दुसऱ्या टॉवरकडे जातो, तेव्हा तिथे पण अशीच प्रक्रिया होते. प्रत्येक टॉवरवर लॉग तयार होतो.
डेटा डंपमध्ये जो डेटा स्टोअर होतो. त्यात फोनशी संबंधित सर्व माहिती जसे की IMEI क्रमांक, मॅक ॲड्रेस, आईपी ॲड्रेस और लोकेशन सह इतर डेटा जतन करण्यात येतो. विविध सॉफ्टवेअरचा वापर करून त्यातून युझर्सचा कॉल लॉग्स, टेक्स्ट मॅसेज, फाईल्स, ब्राऊझिंग हिस्ट्री आणि ई-मेल सारखी माहिती गोळा होते.