फ्लिपकार्टवर Realme P4R 5G चा सेल सुरू, मिळवा 2170 रुपयांची सूट

नवीन फोन खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट 20 हजार रुपयांच्या आसपास असेल आणि तुम्ही या रेंजमध्ये नवीन मिड-रेंज फोन शोधत असाल, तर रियलमी P4R 5G खरेदी करू शकता. 17 जून पासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग रियलमीच्या या खास फोनच्या ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर Realme P4R 5G चा सेल सुरू, मिळवा 2170 रुपयांची सूट
realme p4r 5g sale
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jun 17, 2026 | 10:02 PM

रियलमी कंपनीचा Realme P4R 5G हा स्मार्टफोन 17 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. 8000 mAh बॅटरी आणि एचडी+ रिझोल्यूशनने सुसज्ज असलेल्या या फोनची किंमत 19 हजार ते 20 हजार रूपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही जर या किंमतीच्या रेंजमध्ये नवीन मिड-रेंज स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर हा फोन अनेक प्रभावी वैशिष्ट्ये देतो. कंपनी तीन वर्षांची सुरक्षा आणि दोन ओएस अपग्रेडचे आश्वासन देते. चला तर मग या फोनची किंमत आणि फ्लिपकार्टवर मिळत असलेल्या सवलतीबद्दल जाणून घेऊयात.

Realme P4R 5G स्मार्टफोन किंमत

हा रियलमी मोबाईल 4/128GB, 6/128GB, आणि 6/256GB या तीन व्हेरिएंटमध्ये येतो. 4GB रॅम असलेल्या 128GB व्हेरिएंटची किंमत 18 हजार 999 रूपये आहे, तर 6GB रॅम असलेल्या 128GB व्हेरिएंटची किंमत 20 हजार 999 रूपये आणि 6GB रॅम असलेल्या 256GB व्हेरिएंटची किंमत 22 हजार 999 रूपये आहे.

फ्लिपकार्टवरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC, Axis, ICICI आणि SBI बँक कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर तुम्हाला 2 हजार 170 रूपयांची सूट मिळेल. या किंमतींच्या रेंजमध्ये इतरही अनेक फोन आहेत, जसे की मोटोरोला एज 60 फ्यूजन 5G, विवो T5x 5G आणि ओप्पो K14 5G रियलमीच्या नवीन फोनची स्पर्धा करेल.

Realme P4R 5G वैशिष्ट्ये

  • डिस्प्ले: 1200 निट्सच्या कमाल ब्राइटनेससह, या फोनमध्ये 6.8-इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळेल, जो 144 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.
  • चिपसेट: या रियलमी मोबाईलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • रॅम: या फोनमध्ये 14 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम आहे.
  • कॅमेरा: मोबाईलच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा आणि पुढील बाजूस सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा सेन्सर.
  • एआय वैशिष्ट्ये: या फोनमध्ये एआय अल्ट्रा क्लॅरिटी, एआय इरेझर 2.0, एआय पोर्ट्रेट ग्लो आणि एआय अनब्लर यांसारखी अनेक उत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत.
  • बॅटरी: या फोनमध्ये 8000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज केल्यावर तीन दिवसांपर्यंत चालते. यात 45W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगची सुविधा देखील आहे.
Follow Us