AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात लाँच झाला 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन

सॅमसंगने त्यांचा नवीन फोन भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये मोठी बॅटरी, पॉवरफूल प्रोसेसर, 120 हर्ट्झ डिस्प्ले आणि गॅलेक्सी एआय फीचर्स आहेत. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात लाँच झाला 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 3:36 PM
Share

सॅमसंगने भारतात त्यांचा नवीन Galaxy F70 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर अमोलेड 120 हर्ट्झ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 3 प्रोसेसर, 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आहे. कंपनीने गॅलेक्सी एआय फीचर्स सोबतच सहा वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टीम आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासनही दिले आहे. हा स्मार्टफोन विविध रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत उपलब्धता आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

Samsung Galaxy F70 Pro 5G: किंमत आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 25 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. त्याचबरोबर या फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 29 हजार 999 रूपये आहे. तर 256 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 34 हजार 999 रूपये आहे. लाँच ऑफरचा भाग म्हणून हा स्मार्टफोन 23 हजार 999 रूपयांच्या प्रभावी सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन अल्फा ब्लॅक आणि ऑरा ग्रीन रंगांमध्ये सॅमसंग इंडिया ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F70 Pro 5G: फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G हा अँड्रॉइड 16-आधारित वन UI 8.5 वर चालतो आणि कंपनीने सहा वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम व सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस प्लस संरक्षणासह 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट, 8GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे.

Samsung Galaxy F70 Pro 5G स्मार्टफोनचा कॅमेरा फिचर्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यात OIS सह 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा HDR सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी आणि एआय फिचर्स

सॅमसंगने गॅलेक्सी एफ70 प्रो 5जी मध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर हा फोन 24 तासांपेक्षा जास्त यूट्यूब व्हिडिओ स्ट्रीमिंग, 8 तासांपेक्षा जास्त गेमिंग किंवा 12 तास सोशल मीडिया स्क्रोलिंगसाठी टिकू शकतो. या फोनमध्ये सर्कल टू सर्च, जेमिनी व्हॉइस असिस्टंट, एआय व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन, डायरेक्ट व्हॉइसमेल आणि नाऊ बार यांसारखी गॅलेक्सी एआय फिचर्स देखील आहेत.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात...
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र...
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो...
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो स्टेशनला मिळणार चैत्यभूमी नाव
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या बैठकीत ठरणार रणनीती!
एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी...
Gokul Milk : एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी महागलं?
मतदारांची नावे यादीतून गायब? रोहित पवारांकडून थेट ऑडिओ क्लिप पोस्ट...
मतदारांची नावे यादीतून गायब? रोहित पवारांकडून थेट ऑडिओ क्लिप पोस्ट, भाजपवर गंभीर आरोप!