Samsung : Galaxy M31 ला Android 12 आधारित One UI 4.1 चे अपडेट; ही खास आहेत वैशिष्ट्ये

सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung : Galaxy M31 ला Android 12 आधारित One UI 4.1 चे अपडेट; ही खास आहेत वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलेक्सी M31 Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 9:25 PM

Samsung : देशात अनेकांकडे Samsung फोन आहे. तो अनेकांच्या पसंतीतील पहिला फोन आहे. तर अनेक जन सध्या Galaxy M सीरीजमधील Galaxy M31वापरत असतील त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. आता Samsung त्याच्या जुन्या Galaxy M सीरीज स्मार्टफोन Galaxy M31 साठी Android 12 वर आधारित नवीनतम One UI 4.1 अपडेट आणले आहे. नवीन अपडेटमध्ये, कंपनी व्हर्च्युअल रॅम वैशिष्ट्यासह सुधारित कॅमेरा (Camera) फंक्शन्स, स्मार्ट विजेट्स आणि बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. इतकेच नाही तर कंपनी नवीन अपडेटमध्ये मेनू, बटणे आणि बॅकग्राउंडसह अॅप्ससाठी कलर-आधारित कस्टमायझेशन देखील देत आहे. Galaxy M31 साठी या अपडेटचा आकार 2GB आहे आणि त्याची आवृत्ती M315FXXU2CVCE आहे. हे अपडेट आपोआप डिव्हाइसेसपर्यंत पोहोचत आहे. जर वापरकर्त्याला ते हवं असेल तर तो फोनच्या सेटिंग्जमध्ये दिलेल्या सॉफ्टवेअर अपडेट विभागात जाऊन ते घेवू शकतो.

Galaxy M31 ची वैशिष्ट्ये

फोनमध्ये, 1080X2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4-इंच फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये आढळणारा हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइन आणि पातळ बेझल्ससह येतो. फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये ऑक्टा-कोर Exynos 9611 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 64-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर, 5-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आणि 5-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, ड्युअल सिम व्यतिरिक्त, तुम्हाला या फोनमध्ये ब्लूटूथ 5.0, ड्युअल बँड वाय-फाय 5, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.