AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samsung चा नवीन 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, बाजारात दाखल होण्यापूर्वीच किंमत आणि फीचर्स लीक

कोरियन स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंग (Samsung) शुक्रवारी भारतीय मोबाइल बाजारात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी एम 53 5 जी (Samsung Galaxy M53 5G) असेल. लॉन्च होण्यापूर्वी या फोनबाबत बरीच माहिती समोर आली आहे.

Samsung चा नवीन 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, बाजारात दाखल होण्यापूर्वीच किंमत आणि फीचर्स लीक
Samsung Galaxy M53 5G Image Credit source: Samsung.com
| Updated on: Apr 19, 2022 | 3:16 PM
Share

Samsung Galaxy M53 5G Price: कोरियन स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंग (Samsung) शुक्रवारी भारतीय मोबाइल बाजारात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी एम 53 5 जी (Samsung Galaxy M53 5G) असेल. लॉन्च होण्यापूर्वी या फोनबाबत बरीच माहिती समोर आली आहे. लॉन्च होण्याच्या तीन दिवस आधी या फोनच्या कलर ऑप्शनची माहिती लीक झाली आहे. तसेच आत्तापर्यंत संभाव्य किंमतीपासून ते स्पेसिफिकेशनपर्यंत या 5G स्मार्टफोनबद्दल (5G SmartPhone) माहिती समोर आली आहे. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन नवीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. यामध्ये ग्रीन आणि ब्लू या दोन रंगांचे पर्याय असतील. चला तर मग जाणून घेऊयात कसा असेल नवीन स्मार्टफोन

टिपस्टर सुधांशूने सांगितले की, हा सॅमसंग फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये सादर केला जाईल. ज्यामध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असे दोन पर्याय असतील. हा मिड रेंज स्मार्टफोन असेल. लॉन्च झाल्यानंतर हा फोन रेडमी, रियलमी, ओप्पो आणि व्हिवोच्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.

Samsung Galaxy M53 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M53 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह येतो. यात 120hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. कंपनी या मोबाईलमध्ये MediaTek Dimension 900 चिपसेट देईल. दोन स्टोरेज वेरिएंट व्यतिरिक्त, त्यात एक मायक्रोएसडी कार्ड इन्सर्ट केले जाऊ शकते, ज्याच्या मदतीने फोनमधील स्टोरेज स्पेस वाढवता येईल.

Samsung Galaxy M53 5G चा कॅमेरा सेटअप

Samsung Galaxy M53 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल, तर सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. तसेच 2-2 मेगापिक्सल्सचे आणखी दोन कॅमेरे या फोनमध्ये देण्यात आले आहेत. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Samsung Galaxy M53 5G चा बॅटरी बॅकअप

Samsung Galaxy M53 5G च्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. या बॅटरीसोबत 25W फास्ट चार्जर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला Android 12 OS आणि OneUI 4.1 इंटरफेस दिला जाईल. भारतापूर्वी जगातील इतर देशांमध्ये हा मोबाईल आधीच लॉन्च करण्यात आला आहे.

इतर बातम्या

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात रहा…iPhone 14 ला ‘अशी’ मिळेल कनेक्टिव्हिटी

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme Q5 Pro बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

आता डिलिट नाही भाऊ एडीट कर… ट्वीटर ‘हे’ नवीन फिचर आणण्याच्या तयारीत

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.