AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता डिलिट नाही भाऊ एडीट कर… ट्वीटर ‘हे’ नवीन फिचर आणण्याच्या तयारीत

ट्वीटर सध्या नव्या फिचर्सवर काम करीत आहे. या नवीन फिचर्सच्या माध्यमातून तुम्ही आता तुमचे ट्वीट एडीट करु शकणार आहात. त्यामुळे आता या नवीन फिचर्समध्ये आणखी कसली भर पडतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आता डिलिट नाही भाऊ एडीट कर... ट्वीटर ‘हे’ नवीन फिचर आणण्याच्या तयारीत
माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्वीटर आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवे फिचर आणण्याच्या तयारीत आहे.Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 10:47 AM
Share

माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्वीटर (Twitter) आपल्या वापरकर्त्यांसाठी (Users) एक नवे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन फिचरच्या माध्यमातून वापरकर्ते ट्वीट करताना काही चुका झाल्यास त्या पुन्हा एडीट करुन त्याची दुरुस्ती करु शकणार आहेत. अनेकदा ट्वीट करताना काही चुका झाल्यास ते ट्वीट सरळ डिलिट करावे लागत होते. परंतु आता त्यापासून वापरकर्त्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहे. ट्वीटर सध्या एडीट बटनाच्या पर्यायावर काम करीत आहे. त्यामुळे रेग्युलर ट्वीटरवर सक्रिय राहणार्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अनेकदा ट्वीट डिलिट (Delete) केल्याने संबंधित व्यक्तीला मानहानीला सामोरे जावे लागायचे आता यापासून काही प्रमाणात सुटका होणार आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, एक ट्वीटर युजर Alessandro Paluzzi ने ट्वीटच्या एडीट बटनाची माहिती एका ट्वीटच्या माध्यमातून शेअर केली आहे. सोबतच त्याने या ट्वीटला कॅप्शन दिलेय, की सध्या एडीट बटनावर काम सुरु आहे. तसेच कंपनीने एक पोस्‍टरदेखील शेअर केले आहे, ज्यात ट्वीटला अपेडट करण्यासाठीचा एक पर्याय दिसत आहे. आता नव्या ट्वीटमध्ये हा ऑप्शन दिसून येत आहे. आतापर्यंत कंपनीकडून याची अधिकृत घोषणा किंवा माहिती समोर आली नसली तरी एडीट ऑप्शनबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

एडीटच्या पर्यायाची होतेय चाचपणी

ट्वीटरच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच ट्वीट एडीट करण्याबाबतच्या पर्यायाची माहिती समोर येत आहे. सध्या या नवीन पर्यायाची चाचपणी केली जात असून यात अजून काही बदल करता येतात काय, याची कंपनीकडून माहिती घेतली जात आहे. दरम्यान, हा नवीन पर्याय सर्वांसाठी उपलब्ध आहे, की केवळ ज्या वापरकर्त्यांना ब्लू टीक मिळाली आहे त्यांनाच याचा लाभ घेता येईल, हेदेखील पहावे लागणार आहे.

व्हिडिओतही एडीट ऑप्शन

एका युजरकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यातदेखील अपडेट करण्याचा पर्याय दाखविण्यात आला आहे. हे दोन्ही युजर विना ब्लू टीकचे असल्याने या नवीन पर्यायाचा वापर सर्वांसाठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसात याबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, ट्वीटर अजून काही नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. युट्यूब आणि अजून अनेक प्लॅटफॉर्मवर डिसलाईकचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादी ट्वीट आवडले नाही तर असा पर्यायदेखील देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या काळात याची अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

6.67 इंचांचा डिस्प्ले, 5000mAh बॅटरीसह Infinix चा बजेट फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरावाला Samsung 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.