6.67 इंचांचा डिस्प्ले, 5000mAh बॅटरीसह Infinix चा बजेट फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अक्षय चोरगे

|

Updated on: Apr 17, 2022 | 2:18 PM

स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने (Infinix) भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. इन्फिनिक्स हॉट 11 प्रो 2022 (Infinix Hot 11 2022) असं या स्मार्टफोनचं नाव आहे.

6.67 इंचांचा डिस्प्ले, 5000mAh बॅटरीसह Infinix चा बजेट फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Infinix Hot 11 2022
Image Credit source: Flipkart

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने (Infinix) भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. इन्फिनिक्स हॉट 11 प्रो 2022 (Infinix Hot 11 2022) असं या स्मार्टफोनचं नाव आहे. हा फोन कंपनीच्या जुन्या मॉडेल Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11s चा सक्सेसर आहे, जो गेल्या वर्षी भारतात लॉन्च करण्यात आला होता. लेटेस्ट लॉन्च हा बजेट स्मार्टफोन Redmi 9 Prime, Realme Narzo 30A आणि Samsung Galaxy M12 या स्मार्टफोन्सला भारतीय बाजारात तगडी स्पर्धा देईल. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स (Features) देण्यात आले आहेत. हा फोन पोलर ब्लॅक, सनसेट गोल्ड आणि अरोरा ग्रीन कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

Infinix Hot 11 2022 भारतात 8,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 22 एप्रिलपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

Infinix Hot 11 2022 चे फीचर्स आणि स्पेक्स

  1. Infinix Hot 11 2022 चा डिस्प्ले: नवीन लाँच झालेल्या किफायतशीर फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Infinix Hot 11 2022 मध्ये FHD+ रिझॉल्यूशनसह 6.7 इंचाचा डिस्प्ले, 550 nits ब्राइटनेस, 20:9 आस्पेक्ट रेशो आहे जो Panda Kinged Glass सह सुरक्षित केलेला आहे.
  2. Infinix Hot 11 2022 चा प्रोसेसर: फोनच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर Infinix Hot 11 2022 मध्ये UniSoc T610 प्रोसेसर आहे जो 1.82 GHz स्पीडने परफॉर्म करतो. फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. ज्यामध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज हे त्याचं बेस व्हेरिएंट आहे. Google च्या Android 11 आधारित XOS स्किनवर हा फोन काम करतो.
  3. Infinix Hot 11 2022 चा कॅमेरा : फोनच्या कॅमेरा डिपार्टमेंडबद्दल बोलायचे झाले तर, Infinix चा नवीन HOT 11 2022 स्मार्टफोन 2MP सेकेंडरी लेन्ससह 13MP AI ड्युअल रियर कॅमेरा आणि डेडिकेटेड LED फ्लॅशसह येतो. हा फोन HDR, बर्स्ट मोड, टाइम-लॅप्स आणि स्लो मोशनसह अनेक व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडसह येतो. सेल्फीसाठी, फोनमध्ये 8MP AI कॅमेरा आहे जो पंच-होल डिस्प्लेमध्ये ठेवला आहे.
  4. Infinix Hot 11 2022 ची बॅटरी: फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Infinix Hot 11 2022 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 16 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ, सहा तासांचा गेमिंग टाईम किंवा 22 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाईम देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. तसेच ही बॅटरी एक तासाचा 4G टॉक-टाइम प्रदान करण्यास सक्षम असल्याचेही म्हटले आहे. हे डिव्हाइस 10W चार्जरसह येते.

इतर बातम्या

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना

Textile | कापड उद्योगाला सरकारचे पाठ’बळ’ ! प्रोत्साहन योजनेत 61 प्रस्तावांना मंजुरी; 2.4 लाख नोकऱ्यांचा राजमार्ग तयार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI