50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme Q5 Pro बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

रियलमी (Realme) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने 20 एप्रिल रोजी आपला आगामी स्मार्टफोन रियलमी क्यू 5 प्रो (Realme Q5 Pro) लाँच करण्याची घोषणा केली आहे. Realme च्या Q5 सीरीजचे हे स्मार्टफोन्स चीनी बाजारात लॉन्च केले जातील.

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme Q5 Pro बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Realme Q5 Pro
Image Credit source: Realme
अक्षय चोरगे

|

Apr 18, 2022 | 2:09 PM

मुंबई : रियलमी (Realme) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने 20 एप्रिल रोजी आपला आगामी स्मार्टफोन रियलमी क्यू 5 प्रो (Realme Q5 Pro) लाँच करण्याची घोषणा केली आहे. Realme च्या Q5 सीरीजचे हे स्मार्टफोन्स चीनी बाजारात लॉन्च केले जातील. कंपनी नवीन सिरीज अंतर्गत तीन मॉडेल्स सादर करणार आहे, ज्यामध्ये Realme Q5, Q5i आणि Q5 Pro यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या अधिकृत लॉन्चच्या काही दिवस आधी, कंपनीने Realme Q5 Pro चे पोस्टर जारी केले आहे. कंपनीने पोस्टरद्वारे आगामी स्मार्टफोनच्या डिझाइनचा खुलासा केला आहे. पोस्टर रिलीजच्या माध्यमातून कंपनीने सांगितले आहे की, यांग मी (Yang Mi) ही चिनी अभिनेत्री आणि निर्माती या स्मार्टफोनची ब्रँड अॅम्बेसेडर असेल. पोस्टरमध्ये Yang Mi हातात Q5 Pro घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टरच्या टीझरमध्ये Realme Q5 Pro चे बॅक पॅनल पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये बॅक पॅनलचा रंग पिवळा आहे आणि त्यात चेकबोर्ड पॅटर्नही आहे.

Realme Q5 Pro च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर लीक्स नुसार, स्मार्टफोन मध्ये 6.62 इंच OLED फुल HD+ डिस्प्ले असेल. याला 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल. तसेच या फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. Realme Q5 Pro क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर चिपसेटवर चालेल. आगामी स्मार्टफोनमध्ये युजर्सना 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळवू शकतात.

Realme Q5 pro चा कॅमेरा

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल.

Realme Q5 Pro स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. हा स्मार्टफोन कंपनीच्या स्वतःच्या Realme UI सपोर्टसह देखील येऊ शकतो. आगामी स्मार्टफोनमध्ये युजरला 5,000mAh ची बॅटरी मिळेल. कंपनी यामध्ये 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देईल.

इतर बातम्या

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना

Textile | कापड उद्योगाला सरकारचे पाठ’बळ’ ! प्रोत्साहन योजनेत 61 प्रस्तावांना मंजुरी; 2.4 लाख नोकऱ्यांचा राजमार्ग तयार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें