AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर बोलणं चूक की बरोबर?

मोबाइल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर बोलू नये, हो, अगदी बरोबर म्हटलं आहे. एवढंच नाही तर फोन हाताळूसुद्धा नये.

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर बोलणं चूक की बरोबर?
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 12, 2021 | 11:56 PM
Share

मुंबई : मोबाइलची बॅटरी चार्जिंग होत असताना फोनवर बोलू नये, हो, अगदी बरोबर म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यावेळी त्यावर गेम खेळू नये किंवा मोबाईल हाताळूसुद्धा नये. याचं कारण म्हणजे फोन चार्ज होत असतो तेव्हा तो आपल्या घरातील विद्युत उपकरणाला जोडलेला असतो अर्थात तेव्हा आपल्या विद्युत बोर्डमधून विजेचा प्रवाह एका अशा उपकरणात प्रविष्ट होत असतो जो मुळातच विद्युतग्राही आहे. (speaking on phone while charging Is right or wrong?)

आपला मोबाईल चार्ज होत असताना विद्युत बोर्डातून निघणारा विद्युत दाब केवळ मोबाईलच्या बॅटरीमध्येच नव्हे तर काही प्रमाणात त्या मोबाईलच्या वरच्या भागातही प्रवाहित होत असतो. मोबाईल हे एक प्रकारे चुंबकच आहे, त्यामुळे आपला मोबाईल चार्ज होत असतो तेव्हा त्यात एक प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड तयार होते, त्या फिल्डमुळे फोन मध्ये किंचित कंपनंदेखील निर्माण होत असतात.

हा प्रयोग नक्की करुन बघा

वर लिहिलेल्या माहितीवर तुमचा विश्वास बसत नसेल तर तर एक प्रयोग जरूर करून बघा. तुमचा फोन चार्जिंगला लावलेला असेल तेव्हा त्याला सवयी प्रमाणे हातात न घेता एका हाताने हलक्याने उचला आणि दुसऱ्या तळ हातावर किंवा तळ हाताच्या मागच्या बाजूला हळूवारपणे घासा, किंवा फोनच्या मागच्या बाजूवर (रियर पॅनेलवर) हळुवार बोटे फिरवा, आता तुमच्या लक्षात येईल की, आपल्या हातावर फोन घासला जात असतांना त्यात हलकी कंपनं निर्माण होत आहेत. हेच ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आहे जे तरंगाच्या रुपात आपल्याला जाणवतात.

विस्फोट होऊ शकतो

आता मुळातच जी वस्तू विद्युतग्राही आहे आणि ती विद्युतग्रहण करीत आहे अशा वेळी जर आपण त्या वस्तूचा वापर करायला सुरुवात केली तर त्या विद्युत तरंगामध्ये आणखीन वाढ व्हायला लागते. आपल्याला तर माहीतच आहे की पृथ्वीवरील तरंग अति वाढत गेल्यास काय होतं? अगदी तसंच त्या बॅटरी मध्ये देखील होतं. म्हणजेच विस्फोट होणं.

यात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे फोन चार्ज होत असताना जर कोणाचा फोन आला तर, विद्युतग्राही वस्तू मुळातच विद्युतग्रहण करीत असतानाच फोन येणं म्हणजेच अवकाशातून देखील कंपन्याच्या टॉवरच्या माध्यमातून पुन्हा विद्युत तरंग फोनकडे आकर्षित होतात. म्हणजेच त्या फोन च्या बॅटरीवर पुन्हा दबाव वाढतो. अशाच जर तुम्ही तो फोन उचलला, तर तो दबाव अति प्रमाणात वाढू लागतो.

रेडिएशनचा धोका

एवढेच नव्हे तर फोनच्या माध्यमातून रेडिएशनचा धोका निर्माण होतो. त्यातही आपण करीत असलेल्या इंटरनेटचा वापर आणि हे रेडिएशन आपल्या मेंदूवर ताबडतोब हल्ला करीत असतात. आपण अशा रेडिएशनच्या सान्निध्यात येतो तेव्हा विद्युत दबाव आणि रेडिएशनमुळे आपल्या मेंदूच्या नसांना अतिशय तीव्र स्वरूपाचा धक्का बसून त्या फाटण्याची देखील शक्यता निर्माण होते.

त्यातही आपला मोबाईल नेहमी आपल्या हातात अर्थात चेहऱ्याच्या जवळच असतो आणि अशातच जर फोनवर विद्युत दाब वाढला तर बॅटरी फुटून आपला शरीराला गंभीर अपाय होऊ शकतो, एवढेच नव्हे तर यात जीव सुद्धा गमावला लागू शकतो. म्हणून फोन पूर्ण चार्ज होत नाही, तोपर्यंत फोनचा वापर टाळणे फारच गरजेचं आहे.

इतर बातम्या

तब्बल 7 इंचांचा डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, दमदार कॅमेरा आणि खूपच कमी, मेड इन इंडिया फोनची सर्वत्र चर्चा

OTT म्हणजे काय? भारतातील OTT चे लोकप्रिय प्रकार आणि प्लॅटफॉर्म कोणते? जाणून घ्या सर्वकाही

अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

(Is it Dangerous to Talk on Phone While its Charging?)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?