AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डुअल कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, ‘या’ किफायतशीर स्मार्टफोनच्या लाँचिंगसह जुलै महिन्याची सुरुवात होणार

स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नो (Tecno) आपला नवीन स्मार्टफोन टेकनो स्पार्क गो 2021 (Tecno spark Go 2021) 1 जुलैला लाँच करणार आहे.

डुअल कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, 'या' किफायतशीर स्मार्टफोनच्या लाँचिंगसह जुलै महिन्याची सुरुवात होणार
Tecno Spark Go
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 4:29 PM
Share

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नो (Tecno) आपला नवीन स्मार्टफोन टेकनो स्पार्क गो 2021 (Tecno spark Go 2021) 1 जुलैला लाँच करणार आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. हा फोन स्पार्क गो 2020 (spark Go 2020) ची अपग्रेड केलेली आवृत्ती असून अ‍ॅमेझॉनच्या वेबपेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार तो 1 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सादर केला जाईल. (Tecno Spark GO 2021 is going to launch on 1st july 2021 with 5000 mAh battery and dual camera)

अ‍ॅमेझॉनवर लिस्टिंगबरोबरच कंपनीने या फोनचे फीचर्सही सादर केले आहेत. हा स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेरासह येईल आणि त्याच्या रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. फोनच्या इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात 6.52 इंचाचा एचडी + डॉट नॉच डिस्प्ले मिळेल. या नॉचमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो मायक्रो स्लिट फ्रंट फ्लॅशसह येईल.

कंपनी Tecno spark Go 2021 ब्लॅक, ब्लू आणि ऑरेंज अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000 mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल. हा फोन 4 जी कनेक्टिव्हिटी आणि ब्लूटूथ ऑडिओ शेयरिंग फीचरसह येईल.

Tecno Spark Go 2020 मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आला होता आणि या फोनची किंमत 6,500 रुपये ठेवली गेली होती. हा फोन MediaTek Helio A20 quad-core प्रोसेसरने सुसज्ज आहे. म्हणूनच, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, टेकनो स्पार्क गो 2021 हा देखील बजेट रेंज फोन असेल आणि त्याची किंमत 10000 रुपयांपेक्षा कमी असेल.

इतर बातम्या

WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा

भारतात Nokia चा पहिला 5G फोन लवकरच लाँच होणार, ‘या’ स्मार्टफोन्सची एंट्री

64MP कॅमेरा, 8GB रॅम, नव्या Mi 11 Lite वर 3000 रुपयांचा डिस्काउंट

(Tecno Spark GO 2021 is going to launch on 1st july 2021 with 5000 mAh battery and dual camera)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.