64MP कॅमेरा, 8GB रॅम, नव्या Mi 11 Lite वर 3000 रुपयांचा डिस्काउंट

शाओमी Mi 11 लाइट (Xiaomi MI 11 Lite) हा स्मार्टफोन या आठवड्याच्या सुरूवातीला लाँच केला होता. कंपनीने भारतात एमआय 11 मालिकेचा विस्तार केला आहे.

64MP कॅमेरा, 8GB रॅम, नव्या Mi 11 Lite वर 3000 रुपयांचा डिस्काउंट
Mi 11 Lite

मुंबई : शाओमी Mi 11 लाइट (Xiaomi MI 11 Lite) हा स्मार्टफोन या आठवड्याच्या सुरूवातीला लाँच केला होता. कंपनीने भारतात एमआय 11 मालिकेचा विस्तार केला आहे. एमआय 11 लाइट आता प्री-ऑर्डरसाठी भारतात उपलब्ध आहे. तसेच हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्लिपकार्टवर बर्‍याच ऑफर्स मिळत आहेत. शाओमी Mi 11 लाइट 4 जी भारतात Mi वॉच रिवॉव्ह अॅक्टिव्हसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन Mi 11 सिरीजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. (Xiaomi MI 11 lite pre orders starts in india get up to 3000 Rs discount)

फोन 28 जूनपासून ओपन सेलमध्ये खरेदी करता येईल. परंतु येथे आणखी एक ऑफर आहे जी आपल्याला आकर्षित करू शकते आणि ती म्हणजे 3000 रुपयांची ची सूट. हा फोन 21999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये आपल्याला 6 GB जीबी रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेल खरेदी करता येईल. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी तुम्हाला 23,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन आजपासून प्री ऑर्डर करता येईल.

डिस्काउंट कसा मिळवता येईल?

हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 1500 रुपयांची सूट मिळू शकते. त्याच वेळी क्रेडिट कार्ड आणि नॉन ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळू शकते. एचडीएफसी बँक ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळू शकते. यात तुम्हाला एकूण 3000 रुपयांची सूट मिळवता येईल. हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल, ज्यामध्ये टस्कनी कोरल, जॅझ ब्लू आणि विनी ब्लॅक या रंगांचा समावेश आहे.

फोनमधील फीचर्स

Mi 11 लाइट मध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रीफ्रेश रेट, एचडीआर 10+ सपोर्ट, उत्कृष्ट कॉन्ट्रास्ट आणि रंगांसाठी 10-बिट पॅनेलसह येतो. हा स्मार्टफोन 6.8 मिमी जाड आणि 157 ग्रॅम वजनाचा आहे. हा फोन एका ग्लास रियर पॅनेलसह येतो आणि भारतात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. शाओमीने नुकतंच देशात 4G व्हेरियंट लॉन्च केलं आहे, परंतु भविष्यात त्याचे 5 जी मॉडेल येऊ शकेल असे संकेत कंपनीने दिले आहेत.

फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याने सुसज्ज आहे.

शाओमीने 23 डायरेक्टर मोडसह अनेक फोटोग्राफी स्पेशल फीचर्स फोनमध्ये समाविष्ट केले आहेत. एमआय 11 लाइटमध्ये 4,250 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये साइड-माऊंट फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील आहे. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आलेला नाही, मात्र Xiaomi डिव्हाइससोबत टाइप-सी 3.5 मिमी हेडफोन अडॅप्टर देत आहे.

इतर बातम्या

‘या’ कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर

OnePlus Community Sale : मोबाईलपासून स्मार्ट टीव्हीपर्यतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट

नवा फोन घेताय? ‘या’ 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी

(Xiaomi MI 11 lite pre orders starts in india get up to 3000 Rs discount)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI