Nothing Smartphone : नथिंग स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर ट्विटरवर बॉयकॉटचा ट्रेंड… काय आहे कारण?

दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jul 13, 2022 | 8:58 PM

नथिंग स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर ट्विटरवर बायकॉटचा ट्रेंड सुरु झाला आहे. नेमकी कंपनीकडून अशी काय चूक झाली ज्यामुळे लोक या स्मार्टफोनचा बहिष्कार करत आहे, असा अनेकांना प्रश्‍न पडला आहे. याचीच उत्तरं या बातमीतून जाणून घेणार आहोत.

Nothing Smartphone : नथिंग स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर ट्विटरवर बॉयकॉटचा ट्रेंड... काय आहे कारण?
नथिंग स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर ट्विटरवर बॉयकॉटचा ट्रेंड... काय आहे कारण?
Image Credit source: twitter

Carl Pei यांचा मालकी हक्क असलेल्या नथिंगने (Nothing) नुकताच आपला एक स्मार्टफोन लॉन्च केला. कंपनीने याचे नाव नथिंग फोन (1) असे ठेवले आहे. या स्मार्टफोनचा लाँच इव्हेंट मंगळवारी रात्री 8.30 वाजता सुरू झाला आणि तासाभरात संपला. त्यानंतर ट्विटरवर #DearNothing ट्रेंड होऊ लागला. तर बुधवारी ट्विटरवर #BoycottNothing ट्रेंड होत आहे. हा हॅशटॅग (Hashtag) टॉप ट्रेंडमध्ये समाविष्ट झाला आहे. पण असे काय झाले की लाँच झाल्यानंतर काही वेळातच लोक या फोनला विरोध करत आहेत, असा अनेकांना प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक लोक गुगलवर (Google) या सर्व बाबतीमध्ये सर्चिंग देखील करताना दिसून येत आहेत.

काय आहे प्रकरण?

प्रसाद नावाच्या युटूबरपासून या संपूर्ण स्टोरीला सुरुवात झाली आहे. त्याच्या युट्यूब चॅनेलवरून दावा केला आहे, की नथिंग फोन 1 दक्षिण भारतीय युटूबरन्सना रिव्ह्यूव देण्यासाठी पाठविण्यात आलेला नाही. त्यांनी कंपनीवर भेदभावाचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी कंपनीला ट्रोल करण्यासाठी स्वत: तयार केलेले पत्र दाखवले आहे. त्यात, हा फोन दक्षिण भारतीयांसाठी बनलेला नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे.

बहिष्कार करण्याची मागणी

अनेकांनी याबाबत जाहिरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. हे पत्र स्वतः युट्युबरने कंपनीला ट्रोल करण्यासाठी तयार केले होते. ट्विटरवर युजर्सनी नथिंग ट्रोल करायला सुरुवात केली. #DearNothing नंतर आता #BoycottNothing हॅशटॅग आता ट्रेंड होत आहे. अनेक ट्विटर युजर्स तर एक पाऊल पुढे जात दक्षिण भारतीय टेक यूट्यूबरला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकाने या ब्रँडवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन देखील करत आहेत. हा फोन दक्षिण भारतातील तमिळनाडूमध्ये तयार करण्यात आला आहे, असा मुद्दाही अनेकांनी निर्माण केला आहे. अनेकांनी कंपनीच्या या विचारसरणीचा विरोध केला आहे. काही टेक रिव्ह्यूअरने असाही आरोप केला आहे, की केवळ नथिंगच नाही तर इतर अनेक कंपन्या देखील दक्षिण भारतीय टेक यूट्यूबर्सकडे महत्व देत नाहीत.

काय आहेत फोनमधील फीचर्स

नथिंग फोन (1) भारतात 32,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. या किमतीमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI