AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वन प्लसच्या लेटेस्ट स्मार्टफोनसोबत ईयरबड्स मिळणार मोफत, या माॅडेल्सवर सूरू आहे ऑफर

तुम्ही OnePlus वेबसाइट किंवा तिच्‍या अनुभव स्‍टोअर, Amazon आणि इतर अधिकृत स्‍टोअर किंवा निवडक भागीदार स्‍टोअरवरून हा स्मार्टफोन विकत घेतल्यास, तुम्हाला OnePlus इयरबड्स मोफत मिळू शकतात.

वन प्लसच्या लेटेस्ट स्मार्टफोनसोबत ईयरबड्स मिळणार मोफत, या माॅडेल्सवर सूरू आहे ऑफर
वन प्लसImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 07, 2023 | 8:58 PM
Share

मुंबई :  OnePlus च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच Nord CE 3 Lite फोन लॉन्च केला आहे. या फोनचा सेल 11 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.  OnePlus ने घोषणा केली आहे की एक परिचयात्मक ऑफर म्हणून, हा नवीनतम स्मार्टफोन बँक डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जे ग्राहक Nord CE 3 Lite खरेदी करतील त्यांना OnePlus Nord Buds CE मोफत मिळणार आहे. या इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे. नवीन स्मार्टफोनवर इयरबड्स मोफत मिळत असल्याने या ऑफरचा अनेकांना फायदा होणार आहे.

कुठे मिळतील OnePlus चे मोफत इयरबड्स?

तुम्ही OnePlus वेबसाइट किंवा तिच्‍या अनुभव स्‍टोअर, Amazon आणि इतर अधिकृत स्‍टोअर किंवा निवडक भागीदार स्‍टोअरवरून OnePlus Nord CE 3 Lite विकत घेतल्यास, तुम्हाला OnePlus इयरबड्स मोफत मिळू शकतात. याशिवाय, या कॉम्बोसह OnePlus Nord Watch वर 1,000 रुपयांची सूट (केवळ OnePlus वेबसाइट आणि स्टोअर अॅपवर) देखील उपलब्ध आहे. ही ऑफर 12 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत मर्यादित आहे.

जरी तुम्ही हा ऑफर चुकविला तरी तुम्हाला आणखी एक संधी मिळेल. 16 ते 30 एप्रिल दरम्यान हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 500 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल.

OnePlus Nord CE 3 Lite किंमत

OnePlus Nord CE 3 Lite चे दोन स्टोरेज प्रकार आहेत. 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. हा फोन पेस्टल लाइम आणि क्रोमॅटिक ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या फोनसोबत कंपनी 1,000 रुपयांची बँक डिस्काउंटही देत आहे. मात्र, यासाठी आयसीआयसीआय बँकेचे कार्ड असणे आवश्यक आहे.

OnePlus Nord CE 3 Lite ची वैशिष्ट्ये

नवीन OnePlus फोन 108MP चा प्राथमिक कॅमेरा सह येतो. याशिवाय, फोनमध्ये प्रत्येकी दोन मेगापिक्सल्सचा डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

OnePlus Nord Buds CE इयरबड्सची वैशिष्ट्ये

हे इअरबड्स अंगभूत AI सह येतात. यामध्ये 27mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याच वेळी, त्याच्या केसमध्ये 300mAh बॅटरी आहे. यासह, डिव्हाइसला 4.5 तासांपर्यंत प्लेबॅक, 3 तासांपर्यंत कॉलिंग आणि 20 तासांचा बॅकअप मिळतो.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.