AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलची स्क्रीन वारंवार होते ब्लॅक आऊट ? या उपायांनी स्वत:च करू शकता दुरूस्त, खर्चही वाचेल ना !

जर तुमच्या फोनमध्ये ब्लॅकआऊटची समस्या उद्भवत असेल तर फोन सर्व्हिस सेंटरमध्ये न्यायची गरज नाही. तुम्ही स्वत: ही समस्या सोडवून रिपेअरिंगचा खर्च वाचवू शकता.

मोबाईलची स्क्रीन वारंवार होते ब्लॅक आऊट ? या उपायांनी स्वत:च करू शकता दुरूस्त, खर्चही वाचेल ना !
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 31, 2023 | 11:12 AM
Share

नवी दिल्ली : आजकाल लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांकडेच स्मार्टफोन (smartphone) असतो. पण बऱ्याच वेळेस आपल्या फोनची स्क्रीन ब्लॅक आउट (screen black out) होऊ लागते. त्याच वेळी, अनेक वेळा फोन वापरत असतानाच स्क्रीन ब्लॅक होते आणि काही वेळेत पुन्हा नीट सुरू होते. याला ब्लॅक आऊट म्हणतात. अँड्रॉइड फोनमध्ये (android phone) ही समस्या सामान्य आहे, परंतु स्क्रीन ब्लॅकआउट होताच लोक घाबरतात आणि फोन घेऊन सर्व्हिस सेंटरमध्ये (service center) पोहोचतात. तथापि, थोडे प्रयत्न करून, आपण स्वतःच आपला फोन नीट करू शकतो.

जर तुमच्याही फोनमध्ये ही समस्या येत असेल तर तुम्ही ती सहज सोडवू शकता. पण फोनची स्क्रीन ब्लॅक आऊट नेमकी का होते, हे जाणून घेणे सर्वप्रथ महत्वाचे ठरते. स्मार्टफोनची स्क्रीन ब्लॅकआउट होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि काही सोप्या मार्गांनी ती दूर केली जाऊ शकतात.

आऊटडेटेड ॲप्स

स्क्रीन ब्लॅक आऊट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ॲप्स. काही कालबाह्य किंवा जुनी अॅप्स ही फोनच्या लेटेस्ट ओएसशी सुसंगत नसतात किंवा त्यामध्ये अनेक त्रुटी असू शकतात. त्यामुळे ते तुम्हाला वारंवार त्रास होऊ शकतो.

मायक्रो एसडी कार्डमुळे होऊ शकतो प्रॉब्लेम

अनेक वेळा तुमच्या फोनमध्ये असलेले मायक्रोएसडी हे देखील समस्येसाठी कारणीभूत ठरू शकते. कार्डमध्ये तुम्ही दुसऱ्या फोन किंवा पीसीवरून संगीत, फोटो, व्हिडिओ इत्यादी ट्रान्सफर करता आणि त्यातून व्हायरस येतो आणि हा व्हायरस तुमचा फोन खराब करू लागतो. त्याचबरोबर कार्ड करप्ट झाले किंवा काही कारणाने खराब झाले तरी फोनची स्क्रीन ब्लॅक आऊट होऊ शकते.

व्हायरसमुळे ब्लॅक आऊट

कधीकधी इंटरनेट सर्फिंग किंवा डेटा ट्रान्सफर करताना त्यादरम्यान फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या फोनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. जर फोनची स्क्रीन ब्लॅकआउट होत असेल तर तुमच्या फोनमध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे.

बॅटरीचा असू शकतो प्रॉब्लेम

आजकाल बहुतेक फोन युनिबॉडीसह येतात, ज्यामुळे स्क्रीन ब्लॅकआउटची समस्या उद्भवते आणि आपल्याला त्याबद्दल माहिती देखील नसते. त्यामुळे तुमच्या फोनमधील ॲप्समुळे कोणतीही समस्या नसल्यास, बॅटरीमुळे तुमचा फोन ब्लॅक आऊट होण्याची शक्यता आहे.

ब्लॅक आऊटची समस्या कशी सोडवावी ?

तुमचा फोन वारंवार ब्लॅक आउट होत असेल तर सर्वात आधी नुकतेच इन्स्टॉल केलेले ॲप्स अनइनस्टॉल करा. यामुळे फोन दुरुस्त झाला तर चांगले आहे, अन्यथा तुमचा फोन एकदा सेफ मोडमध्ये सुरू करा.

त्याशिवाय फोन ब्लॅक आऊट झाल्यास एकदा त्याची बॅटरी बाहेर काढून तुम्ही फोन ठीक करू शकता. जर बॅटरी बाहेर येत नसेल तर फोनची बॉडी नीट तपासा की बॅटरी फुगत आहे का? तसे असल्यास, फोनची बॅटरी बदला.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फोनमध्ये कार्ड टाकले असेल तर एकदा कार्ड काढून फोन रीस्टार्ट करा. तुमचा फोन व्यवस्थित काम करेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही व्हायरसची समस्या आहे, तर तुम्हाला फॅक्टरी डेटा रीसेट किंवा हार्ड बूट करावे लागेल. यामुळे तुमचा फोन ठीक होईल. तरीही फोन नीट सुरू झाला नाही तर सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तज्ज्ञांना दाखवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.