AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची मुलं किती वेळ मोबाईल-टिव्ही, टॅबलेट बघतात; पालकांनो ठरवा मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ अन वेळीच ओळखा दुष्परिणाम!

सद्य स्थितीत प्रत्येक पालक त्यांचे मुलं डिजिटल उपकरणावर किती वेळ घालवतो याबद्दल चिंतित आहे. दरम्यान, एका संशोधनात असे समोर आले आहे की, त्यांच्यापैकी फक्त एक टक्के पालक त्यांच्या मुलांची खरोखर काळजी घेतो. स्क्रीन डिव्हाईस वापरण्यापासून मुलांना थांबवू शकणाऱ्या पालकांची संख्या अत्यंत कमी आहे.

तुमची मुलं किती वेळ मोबाईल-टिव्ही, टॅबलेट बघतात; पालकांनो ठरवा मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ अन वेळीच ओळखा दुष्परिणाम!
| Updated on: Jul 24, 2022 | 6:45 PM
Share

मॉट चिल्ड्रन हॉस्पिटल नॅशनल पोल ऑन चिल्ड्रन हेल्थ युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन हेल्थ च्या एका रीपोर्टनुसार, फक्त 50 टक्के पालकांचा असा विश्वास आहे की स्क्रीन टाइमचा (of screen time) त्यांच्या मुलाच्या डोळ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. मोट पोलच्या सह-संचालक सारा क्लार्क म्हणाल्या, “बऱ्याच पालकांना जास्त स्क्रीन वेळेशी संबंधित अल्प आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांबद्दल माहिती नसावी, ज्यामध्ये मुलांच्या डोळ्यांवर होणारा परिणाम समाविष्ट असतो.” “आमचे निष्कर्ष असे सूचित करतात की, काही पालकांना त्यांच्या मुलाच्या डोळ्यांच्या आरोग्यावर आणि दृष्टीवर परिणाम करणाऱ्या activity बद्दल आणि जोखीम कशी कमी करावी याबद्दल गैरसमज (misunderstanding) असू शकतात. ‘सायन्स डेली’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, काही तज्ज्ञांनी वाढलेला ‘स्क्रीन टाईम’ आणि बाहेरचा कमी वेळ या गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. कारण यामुळे मुलांना ‘मायोपिया’ होण्याचा धोका वाढू शकतो किंवा दूरदृष्टीचा धोका (Risk of foresight) संभवतो. ज्यामुळे भविष्यात डोळ्यांच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण गेल्या 30 वर्षांत प्रचंड वाढले आहे.

भविष्यात गंभीर ‘मायोपियाचा’ धोका

संशोधक, क्लार्क म्हणाले, “पालकांनी दररोज किमान एक ते दोन तास मुलांना बाहेर मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित केले पाहिजे कारण नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात डोळ्यांची कार्यक्षमता विकसित होतात.”मुलांनी दिवसभरात किती वेळ डिजिटल उपकरणांच्या स्क्रीनवर घालवावा याबाबत पालकांनी कडक नियम करावेत. हे विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये महत्त्वाचे असते. काही संशोधकांनी ‘मायोपिया’च्या वाढीव शक्यतांसह टॅब्लेट वाचणे किंवा वापरणे यासारख्या जवळच्या कामाच्या कार्यांमधील दुवा देखील दर्शविला आहे. UM हेल्थ केलॉग आय सेंटरच्या नेत्ररोग तज्ज्ञ, ओलिव्हिया किलीन म्हणाल्या, “लहान मुलांसाठी मायोपियाच्या जोखमींबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे. “मायोपियाचा प्रारंभ हा नंतरच्या आयुष्यात गंभीर मायोपियाचे दुष्परिणामांचे संकेत आहे.”

मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागृकता गरजेची

स्क्रीनवर वेळ घालविल्यानंतर, पालक मुलांची दृष्टी आणि डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारे सर्वात सामान्य घटक म्हणजे नित्कृष्ट प्रकाशात(बॅड लाइट)वाचणे, मुले टीव्ही/स्क्रीनच्या किती जवळ बसतात याबाबत पालकांनी जागृक असणे गरजेचे आहे. “काही पालक अजूनही मागील पिढ्यांपासून मुलांच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सल्ल्याचे पालन करू शकतात,” क्लार्क म्हणाले. “खराब प्रकाशात वाचणे किंवा टीव्हीजवळ बसल्याने डोळ्यांना थकवा येऊ शकतो किंवा ताण येऊ शकतो, परंतु यामुळे कायमस्वरूपी नुकसान होणार नाही किंवा डोळ्यांच्या दीर्घकालीन समस्या उद्भवणार नाहीत.” असा समज पालकांना असतो परंतु, तो चुकीचा आहे. पालकांनी मुलांच्या दृष्टीबाबत जागृक असले पाहिजे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.