Cooler : १० हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हे’ उत्तम ब्रँडेड कुलर
काही दिवसांपासून उन्हाच्या झळा लागायला सुरुवात झालीय. अशातच तुम्ही जर नवीन कुलर घेण्याचा विचार करत असाल तर या कंपनीचे कुलर तुम्ही अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे सुद्धा कुलर खरेदी करू शकता ते ही डिस्कॉउंटसह.

काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी झालेला आहे. अशातच कडक उन्हाच्या झळा आत सर्वत्र जाणवू लागल्याने अनेक लोकांनी आता उन्हाळयात लागणारे सुती कपड्यांपासून ते उन्हापासून बचाव करणाऱ्या सर्व गोष्टी कपाटातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तर बरेच लोकं ऑनलाईन कुलर आणि एअर कंडिशनरवरील सर्वोत्तम मिळणाऱ्या सवलती शोधत आहे. तुम्ही सुद्धा नवीन कुलर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही सवलतीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ब्रँडेड कंपन्यांचे एअर कुलर १०,००० रुपयांमध्ये कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.
या कुलरमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक फंक्शन आणि रिमोट कंट्रोल देखील मिळेल. यासोबतच हे कुलर खरेदी केल्यावर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी किंवा हमी देखील मिळेल. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगत असलेले कूलर तुम्ही ऑर्डर करून तुमच्या घरी मागवू शकता.
Kenstar JETT HC 51 डेझर्ट एअर कूलर
ई-कॉमर्स साइट Amazon वर लिस्टेड असलेला हा कुलर तुम्हाला फक्त ७,९९० रुपयांना खरेदी करता येईल. हा कूलर पांढऱ्या रंगाच्या पर्यायात लॉग बॉडीमध्ये येतो. कंपनीने या कूलरमध्ये एक ॲडजस्टेबल फॅन दिला आहे जो तुमच्या खोलीचे वातावरण एकदम थंड करतो.
Usha स्टेलर ZX CP 206T
उषा कंपनीचा हा एअर कूलर ओंलीने प्लॅटफॉर्मवर सध्या ८,११९ रुपयांना उपलब्ध आहे, तुम्ही हा कूलर फक्त ३९४ रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. उषा कंपनीच्या या कूलरमध्ये १३५ वॅटची मोटर आहे आणि तुम्ही हा कूलर खोलीत ठेवून वापरू शकता. या कूलरचा एअर थ्रो १६ फुटांपर्यंत आहे.
Orient Electric 90 L Desert Air Cooler
ओरिएंटचा हा एअर कूलर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लिस्टेड आहे, हा कूलर ५० टक्के सवलतीत तुम्हाला फक्त ९,१९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय, तुम्ही हा एअर कूलर EMI पर्यायावर देखील खरेदी करू शकता. या डेझर्ट कूलरमध्ये तुम्हाला ९० लिटरची पाण्याची टाकी मिळते आणि या कूलरचा एअर थ्रो ५१ फुटांपर्यंत आहे.
Symphony 40 L Room Air Cooler
सिम्फनीचा हा एअर कूलर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून ५० टक्के सवलतीत खरेदी करता येईल. तुम्ही सध्या हे एअर कूलर फक्त ६,४९१ रुपयांना खरेदी करू शकता. सिम्फनीच्या या एअर कूलरमध्ये तुम्हाला ४० लिटरची पाण्याची टाकी मिळते आणि हा एअर कूलर २५ फुटांपर्यंत एअर थ्रो करतो. तुम्ही हे एअर कूलर १०८२ रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता.
