
आपल्या भारतात अनेक दूरसंचार कंपन्या आहेत. जे आपल्या ग्राहकांसाठी व नवीन वापरकर्त्यांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. अशातच एअरटेलने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी त्यांच्या सोयी नुसार फक्त एक नाही तर अनेक उत्तम प्लॅन उपलब्ध केले आहेत. जर तुम्ही देखील एअरटेल प्रीपेड सिम वापरत असाल आणि 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत 28 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन शोधत असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे. तर एअरटेलकडे या किमतीत 28 दिवसांच्या वैधतेचा एक उत्तम प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये किती डेटा मिळेल आणि डेटा व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणते फायदे मिळणार आहे, तसेच या प्लॅनची किंमत देखील जाणून घेऊयात.
एअरटेलच्या 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या स्वस्त प्लॅनची किंमत 199 रुपये आहे. जे सर्वसामान्या ग्राहकांच्या गरजा घेऊन लाँच करण्यात आलेला आहे.
जर तुम्हाला डेटापेक्षा कमी किमतीत 28 दिवसांची वैधता हवी असेल, तर तुम्हाला हा प्लॅन खूपच आवडेल. कारण हा प्लॅन 2 जीबी हाय-स्पीड डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचे फायदे देतो. डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅनमध्ये काही उत्कृष्ट अतिरिक्त फायद्यांचा लाभ घेता येणार आहे. जसे की 199 रुपयांचा प्लॅन जो प्रीपेड वापरकर्त्यांना स्पॅम कॉल आणि एसएमएसपासून संरक्षण करण्यासाठी अलर्ट करतो.
याव्यतिरिक्त तुम्हाला एक-वेळ मोफत हॅलोट्यूनचा लाभ मिळतो. शिवाय, एआयच्या या युगात एअरटेल कसे मागे राहू शकते? कंपनी आपल्या लाखो वापरकर्त्यांना या प्लॅनसह 12 महिन्यांसाठी 17,000 किमतीचा परप्लेक्सिटी प्रो एआयचा लाभ देत आहे.
एअरटेलच्या या प्लॅन सारखाच जिओकडे 199 रुपयांचा प्लॅन नाही, परंतु त्यांच्याकडे 198 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो.
डेटा व्यतिरिक्त, ते दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील देते. एअरटेल प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, परंतु रिलायन्स जिओ कंपनीचा हा प्लॅन फक्त 14 दिवसांच्या वैधतेसह येतो.