विवोचा 7200mAh बॅटरी असलेला हा अप्रतिम फोन झाला लाँच, अशाप्रकारे त्यावर मिळवा 2 हजार रुपयांची सूट

7200mAh बॅटरी असलेला हा नवीनतम विवो फोन ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. जर तुमचे बजेट 20,000 रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही विवोचा हा फोन खरेदी करू शकता. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

विवोचा 7200mAh बॅटरी असलेला हा अप्रतिम फोन झाला लाँच, अशाप्रकारे त्यावर मिळवा 2 हजार रुपयांची सूट
Vivo with 7200mAh battery
| Edited By: | Updated on: Mar 19, 2026 | 8:20 AM

Vivo T5x 5G भारतीय बाजारपेठेत लाँच झाला आहे. या 5G स्मार्टफोनच्या प्रमुख फिचर्समध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स, IP69+ रेटिंग, मिलिटरी-ग्रेड संरक्षण आणि AI फीचर्स यांचा समावेश आहे. तुम्ही जर 7200mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विवोचा हा स्मार्टफोन सर्वात उत्तम आहे. तर या फोनसाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल, सेल कधी सुरू होईल आणि या फोनमध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत, हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

हँडसेटच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18 हजार 999 रूपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20 हजार 999 रूपये आणि 8GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत 22 हजार 999 रूपये आहे. उपलब्धतेनुसार हा फोन 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. लाँच ऑफर्समध्ये HDFC, SBI, Axis Bank आणि UPI द्वारे ₹2,000 पर्यंतच्या इन्स्टंट डिस्काउंटचा समावेश आहे. नो-कॉस्ट EMI पर्यायांमध्ये जिओचा 1 हजार 199 रूपयांचाचा प्लॅन खरेदी केल्यावर सहा महिन्यांसाठी 10 OTT ॲप्सचा मोफत ॲक्सेस समाविष्ट आहे.

हा फोन सायबर ग्रीन आणि स्टार सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाले तर या विवो फोनची स्पर्धा या किंमत रेंजमध्ये मोटोरोला एज 60 फ्यूजन 5G, ओप्पो K13 5G, मोटोरोला g67 पॉवर 5G, रियलमी P4 5G आणि IQOO Z10X 5G सारख्या मॉडेल्सशी आहे.

Vivo T5x 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.76-इंचाचा फुल एचडी प्लस स्क्रीन आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या नवीनतम विवो फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याचा AnTuTu स्कोअर 10 लाखांपेक्षा जास्त आहे.

कॅमेरा सेटअप: या फोनमध्ये मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा सोनी IMX852 कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे.
मागील कॅमेरा 4के व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी: फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 7200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

Follow Us