AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

336 दिवसांसाठी जिओचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन तुम्हाला देईल अनेक फायदे, जाणून घ्या किंमत

जिओच्या सर्वात 336 दिवसांच्या स्वस्त प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. चला तर मग जिओ कंपनीच्या या प्लॅनची वैधता आणि किंमत याबद्दल जाणून घेऊयात.

336 दिवसांसाठी जिओचा 'हा' रिचार्ज प्लॅन तुम्हाला देईल अनेक फायदे, जाणून घ्या किंमत
JIOImage Credit source: Freepik/File Photo
| Edited By: | Updated on: Feb 21, 2026 | 8:12 AM
Share

वाढत्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत लक्षात घेता जिओ कंपनीने मात्र या 336 दिवसांच्या वैधता असलेला स्वस्त रिचार्ज प्लॅन ग्राहकांच व रिलायन्स जिओ प्रीपेड सिम वापरकर्त्यांच लक्ष वेधून घेत आहे. कारण 336 दिवसांचा दीर्घ वैधता असलेल्या या प्लॅनची किंमत फक्त 1हजार 748 रूपये आहे. या स्वस्त प्लॅनमध्ये तुम्हाला कोण-कोणत्या अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचे फायदे मिळणार आहेत. शिवाय या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस देखील आहे. तथापि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा बेनिफिट्स मिळणार नाहीत. याचा अर्थ असा की जर तुम्हाला जर डेटाची आवश्यकता नसेल आणि तुम्हाला फक्त कॉलिंग व एसएमएस पुरता आणि दीर्घ वैधतेचे फायदे हवे असतील तर तुम्हाला हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो.

या प्रीपेड प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील आहेत, जसे की 1,748 रुपयांमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा मोफत प्रवेश तुम्हाला यात मिळणार आहे. हा प्लॅन फक्त व्हॉइस-ऑनली आहे, त्यामुळे त्यात डेटा बेनिफिट्सचा कोणताही समावेश नाही. तुम्हाला हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील व्हॅल्यू सेक्शनमध्ये मिळेल. तसेच हा प्लॅन MyJio अॅपच्या व्हॅल्यू सेक्शनमध्ये देखील उपलब्ध आहे.

1,748 रुपयांच्या प्लॅन व्यतिरिक्त कंपनी 448 रुपयांचा व्हॉइस प्लॅन देखील देते ज्याची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 1000 एसएमएस मिळतात. दोन्ही प्लॅनसाठी अतिरिक्त फायदे समान आहेत.

एअरटेलकडेही असा प्लॅन आहे का?

एअरटेलकडे 1,748 रुपयांचा प्लॅन नाही, परंतु ते वापरकर्त्यांना 1,729 रुपये आणि 1,798 रुपयांचे प्लॅन ऑफर करतात. हे दोन्ही प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या प्लॅनमध्ये डेटा बेनिफिट्स देखील मिळतात.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ