Youtube वर व्हिडीओ बघायचायं, पण हिस्ट्री दाखवायची नाहीये ? अहो Incognito Mode आहे ना

तुम्ही YouTube वर Incognito Mode वापरून तुमची वॉच लिस्ट सीक्रेट अथवा गुप्त ठेऊ शकता. हे कसं करायचं ते जाणून घेऊया.

Youtube वर व्हिडीओ बघायचायं, पण हिस्ट्री दाखवायची नाहीये ? अहो Incognito Mode आहे ना
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 3:19 PM

नवी दिल्ली : बहुतेक लोक मोबाईल अथवा लॅपटॉप वापरत असताना नेटवर सर्फिंग (surfing on internet)करत असतात. अशा वेळेस काही मॅटर अथवा व्हिडीओजही ते बघतात. तुम्हीसुद्धा YouTube वर काहीतरी पाहत असाल आणि त्याची हिस्ट्री सर्च इंजिनमध्ये (search history) दिसू नये असे वाटत असेल तर हे नक्की वाचा. तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. बर्‍याच वेळा युजर्सना (users) त्यांच्या सर्च हिस्ट्रीबद्दल काळजी वाटते. चुकून एखाद्याच्या हातात फोन गेला तर ते सर्च हिस्ट्री ( history)पाहून आपल्याला जज करतील असे त्यांना वाटू शकते. म्हणून ते हिस्ट्री डिलीट करण्याचा मार्ग अवलंबतात.

तुम्हालाही अशी समस्या जणवत असेल तर तुमच्यासाठी उपयुक्त असे एक फीचर आहे, ज्याची माहिती जाणून घेणे फायदेशीर ठरेल. या फीचरच्या मदतीने तुम्ही यूट्यूबवर जो व्हिडिओ पाहाल तो सर्च इंजिनच्या इतिहासात दिसणार नाही.

जेव्हा बरेच युजर्स गुगलवर काही शोधतात तेव्हा, त्याची हिस्ट्री त्यांना फोनमध्ये कायम ठेवायची असते. अशा वेळी ते गुगलचा Incognito Mode वापरतात. अशा परिस्थितीत, आता तुम्ही हा मोड YouTube वर देखील ॲक्टिव्हेट करू शकता आणि तुमची वॉच लिस्ट गुप्त ठेवू शकता.

Incognito Mode वर असा पहा Youtube व्हिडीओ

-Incognito Mode मोडवर YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी, प्रथम तुमच्या फोनवर YouTube ॲप उघडा आणि Incognito Mode चालू करा.

– यासाठी YouTube वर डाव्या बाजूला तीन डॉट्सचा ऑप्शन अथवा पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर अकाउंट सेक्शनवर क्लिक करा आणि टर्न ऑन Incognito या ऑप्शन अथवा पर्यायावर क्लिक करा.

– या प्रक्रियेनंतर, Incognito Mode ॲक्टिव्ह होईल आणि तुम्ही वेगळ्या YouTube वर जाल.

– आता तुम्ही तेथे कोणताही व्हिडिओ पाहिला तरी तो सर्च हिस्ट्रीमध्ये दाखवला जाणार नाही.

youtube वर एकाच वेळी 4 व्हिडिओ पहा

अलीकडेच YouTube ने युजर्ससाठी YouTube TV वर मल्टीव्ह्यू फीचर सादर केले आहे. या फीचरमध्ये युजर्स स्पोर्ट्स कॅटेगरीतील 4 व्हिडिओ एकाच स्क्रीनवर प्ले करू शकतात. हे वैशिष्ट्य सध्या सर्व निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, लवकरच ते प्रत्येकासाठी सुरू केले जाईल.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.