आयुष्यात पहिल्यांदाच पाहायला मिळतं असं सूर्यग्रहण, कुठे पाहाल; कुठे कुठे अंधार पडणार ?

अंतराळात आज एक मोठी रोमांचक घटना घडणार आहे. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये आज एक दुर्लभ नजारा दिसणार आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच असा नजारा दिसतो. जगातील काही निवडक भागातच सूर्य ग्रहण दिसणार आहे.

आयुष्यात पहिल्यांदाच पाहायला मिळतं असं सूर्यग्रहण, कुठे पाहाल; कुठे कुठे अंधार पडणार ?
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 3:07 PM

अंतराळात आज एक मोठी रोमांचक घटना घडणार आहे. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये आज एक दुर्लभ नजारा दिसणार आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच असा नजारा दिसतो. म्हणजे 8 एप्रिल रोजी म्हणजे आज वर्षाचं पहिलं सूर्य ग्रहण लागणार आहे. हे पूर्ण सूर्य ग्रहण असेल. या काळात आकाशात अंधार दाटून येईल. वास्तवात हा नजारा पाहायला मिळत नाही. सूर्य ग्रहण देशातील काही निवडक भागातच दिसणार आहे. म्हणूनच असं दुर्लभ सूर्यग्रहण आयुष्यात केवळ एकदाच पाहायला मिळतं असं म्हणतात.

जेव्हा सूर्य ग्रहण होते तेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामधून मार्गक्रमण करतो. चंद्रमध्येच आल्याने सूर्याचा प्रकाश पूर्णपणे किंवा आंशिक रुपाने दिसत नाही. चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून ठेवतो. त्याची पडछाया पृथ्वीवर पडते. त्यामुळे पाथ ऑफ टोटॅलिटी बनते.

जर वातावरण चांगलं राहिलं तर ढग निरभ्र राहिले तर सूर्यग्रहण पाहणं शक्य होतं. पाथ ऑफ टोटॅलिटीवर चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकोळून घेतो. त्यामुळे आकाश अंधकारमय होतं, जणू काही संध्याकाळ झालीय असं वाटतं.

जो पर्यंत लोक पाथ ऑफ टोटॅलिटीवर राहणार नाही, तोपर्यंत त्यांना आंशिक ग्रहण पाहायला मिळेल. असं झाल्यास त्यांना आधीच्या तुलनेत आकाशापेक्षा अंधार अधिक दिसेल. चंद्र सूर्याला किती रोखतोय यावर सूर्य ग्रहणाची आंशिकता अवलंबून आहे.

पूर्ण सूर्य ग्रहणाची डेट आणि टाईम

2024चं पूर्ण सूर्य ग्रहण 8 एप्रिल रोजी म्हणजे आज होणार आहे. मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडाच्या दरम्यान 185 किलोमीटरच्या अंतरावर पूर्ण सूर्य ग्रहण स्वच्छपणे दिसेल. आकाशात अंधार निर्माण होईल. सूर्य ग्रहण अमेरिकेच्या 18 वेगवेगळ्या राज्यात दिसू शकते. मात्र, भारतात सूर्य ग्रहण दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार आज रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सूर्य ग्रहणाची सुरुवात होईल. पूर्ण सूर्यग्रहणाची सुरुवात रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी होईल. आणि 9 एप्रिल रोजी रात्री 2 वाजून 22 मिनिटांनी संपेल.

सूर्य ग्रहण पाहण्याची पद्धत

सूर्य हा इतका तेजस्वी असतो की उघड्या डोळ्यांनी त्याच्या एखाद्या छोट्याशा भागाकडेही टक लावून पाहिलं तर त्याच्या प्रकाशामुळे आपल्या ( डोळ्यांतील) रेटिना पेशींचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ग्रहण बघण्यासाठी नेहमी ग्रहणासाठी मिळणारा खास चश्म्याच्या वापर करा. हे असे चश्मे असतात जे विशेषतः ग्रहण पाहण्यासाठी डिझाइन केलेले असतात. त्यांचा वापर अवश्य करा. कोणत्याही संरक्षणाशिवाय तुम्ही थेट सूर्याकडे पाहिलंत तर रेटिनाचे नुकसान होऊ शकते, ती होरपळू शकते. त्यामुळे कायमचे नुकसान होऊ शकते आणि अंधत्वही येऊ शकते.

ऑनलाइन पहा सूर्य ग्रहण

तुम्ही जर सूर्यग्रहण पाहू शकत नसाल तर तुम्ही नासाचे लाइव्ह प्रक्षेपण पाहू शकता. 8 एप्रिल रोजी अमेरिकन स्पेस एजन्सी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता थेट लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू करेल. रात्री दीड वाजेपर्यंत लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू राहील.  सूर्यग्रहण लाइव्ह पाहण्यासाठी हा व्हिडीओ बघा.

तुम्ही मॅकडॉनल्ड्स ऑब्झर्व्हेटरीचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकता. त्याशिवाय स्कायवॉचिंग वेबसाइट timeanddate.com यावरही आज रात्री 10 वाजल्यापासून लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू होणार आहे.

Non Stop LIVE Update
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.