AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TRAI चा दणका, 1.77 कोटी सिमकार्ड ब्लॉक, ‘या’ कारणामुळे कारवाई

दूरसंचार क्षेत्रातून एक मोठी बातमी आहे. रोज 1.35 कोटी फेक कॉल बंद केले जात आहेत. याशिवाय बनावट कॉल करणारे 1 कोटी 77 लाख मोबाईल क्रमांक बंद केले आहेत. ही माहिती दूरसंचार विभागाने दिली आहे. लोकांच्या तक्रारींवर विभागाने ही कारवाई केली आहे. पाच दिवसांत सुमारे 7 कोटी कॉल बंद केले आहेत. ही त्यांच्या मोहिमेची सुरुवात असल्याचे विभागाने म्हटले आहे.

TRAI चा दणका, 1.77 कोटी सिमकार्ड ब्लॉक, 'या' कारणामुळे कारवाई
सिम कार्ड
| Edited By: | Updated on: Nov 21, 2024 | 4:18 PM
Share

देशातील 122 कोटी टेलिकॉम युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि TRAI यांनी बनावट टेलिमार्केटिंग कॉलविरोधात लढा तीव्र केला आहे. TRAI ने गेल्या महिन्यात एक नवीन धोरण लागू केले जे थेट ऑपरेटर स्तरावर मार्केटिंग आणि फेक कॉलब्लॉक करण्याची परवानगी देते, ज्यामुळे व्हाईटलिस्टिंगची आवश्यकता नाहीशी होते.

बनावट कॉल रोखण्यासाठी सरकारी दूरसंचार विभागाने कडक पावले उचलली आहेत. नुकतेच विभागाने 1 कोटी 77 लाख मोबाइल क्रमांक बंद केले. येत्या काही दिवसांत आणखी सिमकार्ड ब्लॉक केले जातील, असे सरकारचे म्हणणे आहे. ही त्यांच्या मोहिमेची सुरुवात असल्याचे विभागाने म्हटले आहे.

कारवाईची ही पहिली वेळ नाही

लायकॉम विभागाने फेक कॉलर्स बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी लाखो सिमकार्ड बंद केले होते. फेक कॉल रोखण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. यापुढे कॉलर्सना फक्त व्हाईटलिस्टेड टेलिमार्केटिंग कॉल्स मिळतील.

फेक कॉलविरोधात कारवाई तीव्र

देशातील 122 कोटींहून अधिक टेलिकॉम युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभागाने ट्रायच्या सहकार्याने हे पाऊल उचलले आहे. त्यांनी मिळून फेक कॉलविरोधात कारवाई तीव्र केली आहे. TRAI ने गेल्या महिन्यातच नवे धोरण तयार केले आहे, जेणेकरून ऑपरेटर्स आता स्वतःहून मार्केटिंग आणि फेक कॉल थांबवू शकतील. यामुळे आता व्हाईटलिस्टिंगची गरज भासणार नाही.

45 लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉलला रोखले

दूरसंचार विभागात कार्यरत असलेल्या चार टेलिकॉम सर्व्हिस ऑपरेटर्सनी (टीएसपी) 45 लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉलला टेलिकॉम नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते.

आणखी सिमकार्ड ब्लॉक करणार

अलीकडेच दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, बँका आणि पेमेंट वॉलेटने सुमारे 11 लाख खाती गोठवली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी सिमकार्ड ब्लॉक केले जातील, असे सरकारचे म्हणणे आहे.

फसवणुकीचे कॉल करणाऱ्यांचा शोध

फसवणुकीचे कॉल करणाऱ्या सुमारे 14 ते 15 लाख मोबाईल फोनचा त्यांनी शोध घेतला आहे. युजर्सच्या चिंतेला प्रतिसाद देत विभागाने तातडीने कारवाई करत गेल्या पाच दिवसांत सुमारे 7 कोटी कॉल ब्लॉक करण्यात यश मिळवले आहे.

यूआरएल किंवा एपीके लिंक मेसेज ब्लॉक करणार

आता कॉलर्सना केवळ व्हाईटलिस्टेड टेलिमार्केटिंग कॉल येणार आहेत. तसेच, यूआरएल किंवा एपीके लिंक असलेले मेसेज नेटवर्क स्तरावर ब्लॉक केले जातील. तथापि, व्हाईटलिस्टेड मेसेजस फेक कॉल म्हणून वर्गीकृत केले जाणार नाही.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी