तुम्हीही कॉल ड्रॉपला वैतागले आहात? तक्रार कुठे आणि कशी करायची?

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने अशा समस्यांचं निराकरण करण्यासाठी अनेक अॅप उपलब्ध करुन दिली आहेत

तुम्हीही कॉल ड्रॉपला वैतागले आहात? तक्रार कुठे आणि कशी करायची?

नवी दिल्ली : सध्या मोबाईलवरील कॉल ड्रॉपची (Call drop) समस्या वाढली आहे. दिवसभरात प्रत्येकाचे किमान दोन-चार कॉल ड्रॉप (Call drop) होतातच. देशभरात नेटवर्कची समस्या आहे. कॉल ड्रॉप झाल्यानंतर आपण पुन्हा एक दोनवेळा कॉल करुन, संभाषण संपवतो. आपण कधी त्याची तक्रार करण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने अशा समस्यांचं निराकरण करण्यासाठी अनेक अॅप उपलब्ध करुन दिली आहेत.

कॉल ड्रॉप, केबल किंवा टीव्हीला मिळणारं नेटवर्क या सर्वांच्या तक्रारी तुम्ही करु शकता. ट्रायचे माय कॉल अॅप (TRAI MyCall) आहे, त्यावरुन तुम्ही तक्रार करु शकता.

TRAI MyCall अॅप क्राऊड सोर्स कॉल क्वालिटी मॉनिटरिंग अॅप आहे. या अॅपद्वारे तुम्ही रियल टाईममध्ये थेट ट्रायकडे आपला व्हॉईस कॉल क्वालिटीकडे रिपोर्ट करु शकता. कॉल ड्रॉप, खरखर, आवाजातील विलंब याबाबतच्या तक्रारी करु शकता.

TRAI कडे तक्रार कशी करायची?

  • सर्वात आधी तुम्हाला MyCall app हे अद्ययावत अॅप डाऊनलोड करावं लागेल
  • डाऊनलोड केल्यानंतर अॅप आवश्यक परवानगी मागेल, जसे कॉन्टॅक्ट, कॉल हिस्ट्री, मेसेज, लोकेशन वगैरे.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनवरुन एखाद्याला कॉल करा किंवा एखाद्याला तुमच्या नंबरवर कॉल करायला सांगा
  • कॉल जसा कट किंवा डिस्कनेक्ट होईल, तेव्हा एक पॉप-अप विंडो समोर दिसेल. तिथे तुम्हा कॉलला रेटिंग देण्याबाबत विचारलं जाईल
  • तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार संबंधित कॉलला रेटिंग द्या.
  • जर तुमचा कॉल ड्रॉप झाला असेल, तर कॉल ड्रॉप बटणावर क्लिक करावं लागेल
  • त्यानंतर सबमिट बटण दाबा, तुमच्या समस्येची नोंद होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI