AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TVS Ntorq 125 XT: होणार भारतात लॉंच; ‘डिजिटल हायब्रिड डिस्प्ले’ सह अनेक नवे फीचर्स.. तुमच्या ‘स्मार्टफोन’ शीही होणार कनेक्ट !

TVS Ntorq 125 XT भारतात लॉंच करण्यात आली आहे. ही स्कूटर नियॉन ग्रीन कलरमध्ये हायब्रिड TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह येते. याशिवाय यात आधुनिक व्हॉइस असिस्टंटची सुविधा देखील उपलब्ध आहे.

TVS Ntorq 125 XT: होणार भारतात लॉंच; ‘डिजिटल हायब्रिड डिस्प्ले’ सह अनेक नवे फीचर्स.. तुमच्या ‘स्मार्टफोन’ शीही होणार कनेक्ट !
‘डिजिटल हायब्रिड डिस्प्ले’ सह अनेक नवे फीचर्स..Image Credit source: Google
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: May 02, 2022 | 6:55 PM
Share

TVS ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन स्कूटर लॉंच (New scooter launch) केली आहे, जी ‘निऑन ग्रीन कलर’ थीमसह येते. यात हायब्रिड TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. यात ‘अॅडव्हान्स व्हॉईस असिस्टंट’ ची सुविधा आहे. ही स्कूटर ‘डिस्क ब्रेक’ (Scooter disc brakes) प्रकारात नॉक करेल. कंपनीकडे आधीच TVS N Torque 125 रेंज आहे आणि आता कंपनीने Ntorq 125 XT सादर केला आहे. टीव्हीएस कंपनी काही दिवसांसाठी त्याचा टीझर रिलीज (Teaser release) करत आहे. कंपनीचा दावा आहे की यात अधिक चांगले मायलेज देण्याची क्षमता देखील आहे. या TVS स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,02,823 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध असून, तुम्ही ती तुमच्या जवळच्या TVS शो रूममधून खरेदी करू शकता.

TVS Ntorq 125 XT वैशिष्ट्ये

TVS Ntorq 125 XT मध्ये एक विशेष TFT डिस्प्ले आहे, यात रंगीत TFT डिस्प्ले आहे, जो वापरणाऱ्यांना चांगला अनुभव देण्यासाठी काम करेल. तसेच, कंपनीने स्वतःचे व्हॉईस असिस्टंट फीचर्स दिले आहेत, ज्याच्या मदतीने यूजर्स डायरेक्ट व्हॉईस कमांड प्राप्त करू शकतात. तसेच, या स्कूटरमध्ये TVS IntelliGo तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्याला सायलेंट, स्मूथ आणि उत्कृष्ट स्टार्ट/ऑफचा पर्याय देण्यात आला आहे.

इंधनाची होईल बचत

नवीन स्कूटरला हलके आणि स्पोर्टी अलॉय व्हील मिळाले आहेत. TVS Ntorq 125 XT हे हलके आणि स्पोर्टी अलॉय व्हीलसह येते. यामुळे रायडर्सना इंधनाची बचत करणे सोपे होईल, असा दावा ब्रँडने केला आहे. या स्कूटरमध्ये ट्रॅफिक टाइमरही दिसणार आहे. तसेच तुम्ही थेट AQI ट्रॅक करण्यास सक्षम असाल. यामध्ये तुम्हाला क्रिकेटचा लाइव्ह स्कोअर देखील पाहता येणार आहे. ही स्कूटर अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या स्मार्टफोनशी कनेक्ट करता येते. यासाठी फोनमध्ये SmartXNext अॅप इन्स्टॉल करावे लागेल.

या स्कूटरशी होईल स्पर्धा

भारतीय स्कूटरच्या बाजारपेठेत, TVS Ntorq 125 XT स्कूटरची स्पर्धा Suzuki Avenis (किंमत 86,500), Honda Grazia 125 (Rs 80,175) आणि Aprilia SR 125 शी होईल.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...