AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात लवकरच लाँच होणार Vivo चे ‘हे’ दोन स्मार्टफोन; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

विवो कंपनीचे Vivo T1 Pro 5G आणि Vivo T1 44W हे दोन स्मार्टफोन 4 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या इव्हेंटला लाइव्ह पाहण्यासाठी कंपनीने आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा इव्हेंट लाईव्ह स्ट्रीम करण्यात येणार आहे.

भारतात लवकरच लाँच होणार Vivo चे ‘हे’ दोन स्मार्टफोन; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
SmartphonesImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 12:26 PM
Share

विवो आपले Vivo T1 Pro 5G आणि Vivo T1 44W हे दोन स्मार्टफोन (smartphones) लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. 4 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँचिंग इव्हेंट होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. नवीन T1 Pro हा मोबाईल एका महागड्या व्हर्जनसह फेब्रुवरीमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. Vivo T1 Pro ची डिझाइन नुकताच लाँच करण्यात आलेल्या आयक्यूओओ झेड6 प्रो (IQOO Z6 Pro) सारखी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विवोचा हा फोन त्याच फोनचा रिब्रांड असल्याचेही म्हटले जात आहे. Vivo T1 5G वर 18W स्पीडच्या तुलनेत Vivo T1 44W ला 44W इतका फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.

या दोन्ही फोनमुळे कंपनीच्या टी-सिरीज लाइनअपचा अधिक विस्तार होणार आहे. याच्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट, 90Hz 6.44 इंच डिसप्ले आणि 5000mAh बॅटरीसोबत उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे. Vivo T1 44W ची किंमत, स्पेसिफिकेशन्स व डिझाइनबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Vivo T1 Pro ची डिझाइन

यात सेल्फी स्नॅपर आणि स्क्रीनच्या खाली एक मोठा बेजल ठेवण्यासाठी एक वॉटरड्रॉप नॉच देण्यात आले आहे. युएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रील आणि कदाचित सिम ट्रे सेक्शन खालील भागात असू शकते. हा फोन काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध होउ शकतो. Vivo T1 44W ची डिझाइन Vivo T1 5G सारखी असू शकते. भारतात Vivo T1 Pro ची किंमत बेस मॉडलसाठी जवळपास 25000 रुपयांच्या रेंजमध्ये असू शकते. तर Vivo T1 44W मॉडलची किंमत भारतात जवळपास 15000 रुपये असण्याची शक्यता आहे.

Vivo T1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

1) Vivo T1 Pro मध्ये 6.4 इंच एफएचडी प्लस डिसप्ले 2) 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 90Hz रिफ्रेश रेट सेल्फी स्नॅपर 3) क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778जी 5G प्रोसेसर 4) 8जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज 5)66W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट 6) प्रायमरी सेंसर 64 एमपी युनिट, 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेंस

Vivo T1 44W चे स्पेसिफिकेशन्स

1) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर 2) बूट अँड्रोइड 12 कस्टम स्किन 3) सेफ्टीसाठी इन डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर 4) फोनच्या मागील बाजूस ट्रीपल कॅमेरा 5) 50 एमपीचे प्रायमरी सेंसर आणि 2एमपी युनिट 6) सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फ्रंटला 16एमपीचे स्नॅपर

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.