OYO ROOM किंवा हॉटेलमध्ये आधार देण्यापूर्वी करा हे काम, अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे
masked aadhaar card: मास्कड आधार कार्डचा वापर ट्रेनमध्ये प्रवास करतात, हॉटेल बुकींग करतात, विमानतळावर सर्वच ठिकाणी करु शकतात. आधार कार्ड सर्वच ठिकाणी गरजेचे झाले आहे. ते एक महत्वाचे ओळखपत्र झाले आहे. परंतु त्या माध्यमातून तुमची सर्व माहिती लिक होण्याचा धोका आहे.
masked aadhaar card: तुम्ही जेव्हा OYO रूम बुक करतात किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर तुमचे आधार कार्ड देतात, तेव्हा ओरिजनल आधार कार्डची कॉपी देऊन टाकतात. परंतु हा प्रकार तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतो. यामुळे तुमची महत्वाची माहिती लिक होऊ शकते. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. यामुळे आधार कार्ड देण्यापूर्वी खबरदारी घ्या. मास्कड आधार कार्ड (Masked AADHAAR CARD) द्या. या आधार कार्डमध्ये तुमची सर्व माहिती सुरक्षित असते.
काय असते मास्कड आधार कार्ड
आधार कार्डप्रमाणे मास्कड आधार कार्ड एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. त्याचा वापर तुम्ही ओळखपत्र म्हणून करु शकतात. मास्कड आधार कार्डमध्ये आधार नंबरचे पहिले 8 अंक लपलेले असतात. लोकांना फक्त 4 अंक दिसतात. तुमचा आधार नंबर दिसत नसल्याने तुमची सर्व माहिती सुरक्षित राहते. त्यामुळे कोणीही तुमचा आधार कार्डचा गैरवापर करु शकत नाही.
सर्वच ठिकाणी मास्कड आधार वापरा
मास्कड आधार कार्डचा वापर ट्रेनमध्ये प्रवास करतात, हॉटेल बुकींग करतात, विमानतळावर सर्वच ठिकाणी करु शकतात. आधार कार्ड सर्वच ठिकाणी गरजेचे झाले आहे. ते एक महत्वाचे ओळखपत्र झाले आहे. परंतु त्या माध्यमातून तुमची सर्व माहिती लिक होण्याचा धोका आहे. यामुळे आधारकार्ड कुठेही देताना मास्कड आधार कार्डचा वापर करा.
असे करा Masked AADHAAR CARD डाउनलोड
- प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
- वेबसाइटवरील डाउनलोड आधार विभागात जा. त्यानंतर ‘माय आधार’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा लिहिल्यानंतर पाठवा OTP पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, हा OTP टाकल्यावर पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
- पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला डाउनलोड पर्याय दिसेल. डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.
- डाउनलोड केल्यानंतर, एक चेकबॉक्स दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला मास्क केलेला आधार हवा आहे का? तर यावर टीक करा.
- तुमचे मास्कड असलेले आधार कार्ड डाउनलोड होईल. परंतु ही प्रक्रिया येथे संपत नाही.
- डाउनलोड केलेले मास्कड आधार कार्ड PDF लॉक केलेले असते.
- मास्कड् आधार कार्डची PDF उघडण्यासाठी तुमच्या नावापुढे चार शब्द लिहा.
- तुमचे नाव VIKAS असेल, तर पहिले चार शब्द असतील- VIKA, यानंतर DOB YYYY भरा, याच्या पुढे जन्मतारीख 1998 असेल तर पासवर्ड VIKA1998 असेल.