AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चार टिप्स वापरून वाढवू शकता तुमच्या यूट्यूब चॅनलचे सब्सक्राइबर्स, तेही अगदी मोफत

जर तुमचे देखील यूट्यूब चॅनेल असेल तर साहजिकच तुम्हाला तुमच्या चॅनेलचे सबस्क्राइबर्स वाढवायचे आहेत आणि तेही मोफत? कारण जेवढे जास्त सबस्क्राइबर्स (Tips For YouTube Channel) असतील, तेवढे जास्त व्ह्यूज व्हिडिओला येतील.

या चार टिप्स वापरून वाढवू शकता तुमच्या यूट्यूब चॅनलचे सब्सक्राइबर्स, तेही अगदी मोफत
असे वाढवा सब्सक्राइबर्स Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 16, 2023 | 11:08 PM
Share

मुंबई : दररोज मोठ्या संख्येने लोक YouTube वर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहतात. इथे तुम्हाला गाणी, टीव्ही मालिका, चित्रपट अशा इतर अनेक गोष्टी मिळतात. यासाठी लोक यूट्यूबवर स्वतःचे चॅनल तयार करतात आणि नंतर त्यांच्या आवडीनुसार व्हिडिओ शेअर करतात. जसे- फूड व्हिडिओ, गाण्याचे व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ इ. त्याच वेळी, YouTube निर्मात्यांना यूट्यूबर्सला YouTube द्वारे त्यांच्या चॅनेलवर दरमहा मिळालेल्या व्हूनुसार पैसे दिले जातात. अशा परिस्थितीत, जर तुमचे देखील यूट्यूब चॅनेल असेल तर साहजिकच तुम्हाला तुमच्या चॅनेलचे सबस्क्राइबर्स वाढवायचे आहेत आणि तेही मोफत? कारण जेवढे जास्त सबस्क्राइबर्स (Tips For YouTube Channel) असतील, तेवढे जास्त व्ह्यूज व्हिडिओला येतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मार्गाने तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राइबर्स वाढवू शकता.

सबस्क्राइबर्स वाठवण्यासाठी या आहेत सोप्या टिप्स

  1. जर तुम्ही youtuber असाल आणि तुम्हाला तुमचे सदस्य वाढवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कंटेंटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नेहमी वेगळा विषय निवडा. लोकांना काय पाहायचे आहे याचा अभ्यास करा. तुम्ही ट्रेंडिंग विषय इ. निवडू शकता. कंटेन्टबद्दल अपडेट राहा.
  2. तुमच्या कंटेन्टचा विषय हा कसा आकर्षक करता येईल याची काळजी घ्या. यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या गुणवत्तेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एडिटींगमध्ये इफेक्ट्स वापरा. हे काम एडिटींगच्या वेळी करता येते. असे केल्याने तुमचे फॉलोअर्स वाढू शकतात.
  3. YouTube वर सबस्क्राइबर्स वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या चॅनेलवर लाईव्ह जाणे. लाईव्ह जा आणि तुमच्या फॉलोअर्सशी बोला, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. गप्पा मारा. हे करून तुम्ही चांगले फॉलोअर्स वाढवू शकता.
  4. एकदा तुम्ही व्हिडिओ बनवला आणि तो तुमच्या YouTube चॅनेलवर अपलोड केला की, तो शेअर करायला विसरू नका. व्हिडिओची लिंक तुमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. हे तुमचे फॉलोअर्स वाढवण्यात देखील मदत करू शकते. याशिवाय व्हिडीओचा एसईओ करायला विसरू नका. थमनेल ईमेज आकर्षक वापरा.

Follow Us
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...